COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : ४ सप्टेंबरच्या माझ्या नवऱ्याची बायकोच्या एपिसोडची गुरु पासून झाली. गुरु बाहेर येऊन बघतो तर टेबलावर राधिकाच्या बॅग दिसते एवढ्यात मागून राधिकाच्या त्याला चाहूल लागते म्हणून, केड्याला शनायाच्या वागण्या बद्दल फोनवरून धमकावण्याचे नाटक करतो परत्नू त्यांचे ते नाटक जास्तवेळ टिकून राहत नाही. खोटे खोटे बोलत असतानाच गुरूचा फोन वाजतो आणि त्याच्या नाटकावर पडदा पडतो.


दरम्यान गुरु निघून गेल्यावर त्याचे नक्की काय चाललेय याच विचारात राधिका हरवून जाते. दरम्यान ऑफिसला गेल्यावर सर्वांशी चर्चा करीत असताना शनाया येते आणि राधिकाला व इतर स्टाफला न जुमानता आत्मविश्वासाने वावर करू लागते आणि गुरुलाही जास्त महत्व देत नाही. तिच्यात अचानक एवढा आत्मविश्वास आला तरी कुठून याच विचाराने राधिका काळजीत पडते. काही वेळाने युनियनचे मिस्टर नाईक ऑफिसमध्ये येतात आणि राधिकाबद्दल शनाया त्यांचे कान भरते.


तिचे बोलणे ऐकून मिस्टर नाईक सर्वांवर जाम भडकतात आणि जोराने कांगावा करू लागतात. काही वेळाने नाईक निघून गेल्यावर राधिका शानयाला तिच्या शैलीत उत्तर देऊन गप्प करते. दरम्यान बदललेल्या शनायाला गुरु असे का वागत आहेस असे खडसावून विचारू पाहतो पण शनाया त्याला मुळीच जुमानत नाही.