प्रेरणा कोरगांवकर, मुंबई : कलाकार मंडळी नेहमीच त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन आपल्या डेली लाईफमधील प्रत्येक अपडेट चाहत्यांसोबत शेअर करताना दिसतात. आणि फॅन्स देखील आपल्या लाडक्या सेलिब्रिटींसोबत सोशल मीडियाद्वारे कनेक्ट होत असतात.नुकताच 'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेतील गुरुनाथ अर्थात अभिनेता अभिजीत खांडकेकरने आपल्या लाडक्या सासूबाईंसाठी एका ग्रॅण्ड सोहळ्याचं आयोजन केलं होतं. गुरुनाथची सासू म्हणजेच अभिनेत्री सुखदा खांडकेकरची आई. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 




अभिजीत खांडकेकर आणि सुखदा खांडकेकर हे मराठी इंडस्ट्रीतील सर्वात क्यूट कपल आहे. दोघांच्या रोमॅन्टिक फोटोंची नेहमीच चर्चा पाहायला मिळते. त्यात नुकतेच सुखदाने आईच्या 61 व्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे काही खास फोटो शेअर केले आहेत.


सुखदासाठी आईच्या चेहऱ्यावरील स्माईल खूपच महत्त्वाची आहे . तर अभिजीतसाठी त्याच्या सासूबाईंचा आनंद अग्रस्थानी आहे हे त्याच्या या पोस्टमध्ये दिसून आलं.. चाहत्यांनी देखील अभिजीत आणि सुखदा सासूबाईंच्या एकसष्टी पुजनासाठी केलेला एवढा खटाटोप पाहून दोघांचं कौतुक करायला सुरुवात केलीये.




अगदी पारंपारिक रित्या जवळच्या लोकांच्या उपस्थित सुखदाच्या आईचा 61 वा वाढदिवस सेलिब्रेट करण्यात आला.. सध्या सोशल मीडियावर या फोटोंची चांगलीच चर्चा आहे.या खास इव्हेंटसाठी सुखदा आणि अभिजीतने केलेला पेहराव देखील सध्या चांगलाच चर्चेत आहेत.



या लव्हबर्डने एकमेकांना मॅचिंग होईल असा पेहराव केल्याचं यावेळी दिसून आलं. त्यात सुखदाच्या डिझाईनर साडीच्या देखील चाहते प्रेमात आहेत. कमेंट करत अनेकांनी सुखदाला तिच्या लूकबद्दल प्रश्न विचारायला सुरुवात केली.



एकूणच काय, तर आईसाहेबांसाठी काय पण ? असं म्हणत या दोघांनी हा सोहळा अगदी थाटामाटात पार पाडला आहे ,असंच दिसतंय.