शनायाच्या `या` हटके लूकचं कारण काय ?
माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेच्या लोकप्रियतेत दिवसेंदिवस वाढ होत आहे.
मुंबई : माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेच्या लोकप्रियतेत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मालिका सध्या वेगळ्या वळणावर पोहचल्याने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. गुरुनाथ व शनायाचं प्रकरण उघडं पडल्याने त्या दोघांनाही धडा शिकवण्याचा पण तिने केला आहे. त्यामुळे त्या तिघांची जुलगबंदी चांगली रंगली असून प्रेक्षक ही धम्माल चांगलीच एन्जॉय करतात.
राधिका म्हणजेच अनिताने शनायाचा एक खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. हा फोटो सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. यात शनायाच्या चेहऱ्याला काळं फासलेलं दिसत आहे. बाजूला राधिका आणि गुरु देखील आहेत. तोंडाला काळं फासल्याने लाज न वाटता शनाया तो लूक एन्जॉय करताना दिसत आहे.
याशिवाय अनिता आणि अभिजीतच्या चेह-यावरील हावभावही काहीसे हटके आहेत. त्यामुळे रसिकाच्या चेह-यावर काळं फासल्याचं कारण काही स्पष्ट झालेलं नाही. आता ही सेटवरची गंमत आहे की हा मालिकेचा भाग हे कळलेलं नाही. मात्र सध्या 'माझ्या नव-याची बायको' मालिकेचं कथानक ज्या वळणावर आहे ते पाहता रसिकाचा हा लूक म्हणजे मालिकेच्या एखाद्या भागातील सीन असू शकतो.