गायिका सोना यांनी सांगितली, कैलाश खेर यांनी केलेल्या लैंगिक छळाची घटना
गायक सोना यांनी म्हटलं आहे, कैलाश खेर यांनी एकदा माझ्या मांडीवर....
मुंबई : गायिका सोना महापात्राने संगीतकार आणि गायक कैलाश खेरवर शोषणाचे आरोप लावले आहेत. गायक सोना यांनी म्हटलं आहे, कैलाश खेर यांनी एकदा तिला मांडीवर नको वाटणारा स्पर्श करत, हात फिरवला होता. गायिकाने एक ट्वीट करत सांगितलं आहे की, एका अधिकृत भेटीत कैलाश तिच्यासोबत असा वागला होता.
सोना यांनी लिहिलंय, मी एका कॉन्सर्टशी संबंधीत बोलण्यासाठी कैलाश यांना पृथ्वी कॅफेत भेटण्यासाठी गेले होते. या कॉन्सर्टमध्ये आम्हाला गायचं होतं.
कैलाशने चर्चे दरम्यान माझ्या फक्त मांडीवरच हात फिरवला नाही, तर म्हणाला होता की, तू खूप सुंदर दिसते. चांगलं आहे की, तुला एक संगीतकार पती (संगीतकार राम) मिळाला. बरं झालं अभिनेता नाही मिळाला. हे ऐकून मी लगेच तिथून निघून गेली.
गायिका सोना यांनी म्हटलंय की, या घटनेनंतरही कैलाश थांबले नाहीत, ढाका पोहोचल्यानंतर आयोजन स्थळावर जाताना, कैलाश यांनी मला सतत फोन केले, मी फोन घेतले नाहीत. यानंतर कैलाश यांनी आयोजकांना सांगितलं की, कैलाश यांनी तुम्हाला भेटण्यास सांगितलं आहे.
सोना महापात्रा यांनी म्हटलं आहे की, कैलाश खेर हे किती महिलांची माफी मागतील. जरी त्यांनी माफी मागण्यास सुरूवात केली तरी त्यांना आयुष्यभर माफीच मागावी लागेल.
या आरोपांविषयी जेव्हा कैलाश खेर यांना विचारण्यात आलं तेव्हा ते म्हणाले, मी हे आरोप ऐकून फारच निराश झालो आहे, त्यांना या घटनेबद्दल कोणतीही माहिती नाहीय. ही घटना देखील आपल्याला आठवत नसल्याचं कैलाश खेरने म्हटलं आहे.
कैलाश म्हणतात, जे कुणी मला ओळखतात, आणि मला भेटलेले आहेत, ते जाणतात की मी मानवतेचा किती सन्मान करतो, विशेष म्हणजे महिलांचा. मीडियाच्या लोकांचा मी खूप सन्मान करतो, कारण त्यांचं काम खूप कठीण आहे.