कंगना आधी माफी माग तरच चित्रपट प्रदर्शित होईल, पत्रकारांचा इशारा
नेहमी वादाचं मुकूट डोक्यावर घेवून फिरणारी बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानौत खुद्द वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे.
मुंबई : नेहमी वादाचं मुकूट डोक्यावर घेवून फिरणारी बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानौत खुद्द वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. प्रत्येक वेळी एका नव्या वादाशी कंगनाचं नाव जोडले जाते. 'जजमेंटल है क्या' या चित्रपटातील गाणं प्रदर्शित करण्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात उपस्थित एका पत्रकारा सोबत तिचे भांडण झाले होते. तिच्या अशा वागणुकीचा फटका मात्र तिचा आगामी 'जजमेंटल है क्या' चित्रपटला बसणार आहे.
आपल्या चित्रपटाविषयी नकारात्मक प्रतिक्रिया देणाऱ्या पत्रकाराला 'तुम तो हमारे दुश्मन बन गए यार....बडे घटिया बाते लिख रेह हो', असं म्हणत कंगनाने धारेवर धरलं. या प्रकरणी काही जेष्ठ पत्रकार निर्माती एकता कपूरची भेट घेणार आहेत. कंगनाने पत्रकारांची माफी मागावी अशी मागणी या भेटीमध्ये करणार आहेत, नाहीतर ‘जजमेंटल है क्या’ चित्रपटाच्या प्रमोशनवर बहिष्कार टाकण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
प्रत्येक वेळी आपल्या सोयीने वागणाऱ्या कंगनाचा हा स्वभाव पाहता नेटकऱ्यांनीही तिच्यावर तोफ डागल्याचं पाहायला मिळालं. तिच्या या वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो पाहता येत्या काळात कंगनाचं संकट वाढतं का हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे.