मुंबई : मंगळवारी सर्वोच्च न्यायालयानं 'तीन तलाक' या स्त्रियांच्या हक्कांवर गदा आणणाऱ्या परंपरेला 'घटनाबाह्य' ठरवत बंदी आणली... परंतु, या परंपरेला आत्तापर्यंत अनेक स्त्रिया बळी पडल्यात... त्यात एका बॉलिवूड अभिनेत्रीचाही समावेश आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही अभिनेत्री म्हणजे मीना कुमारी... आपल्या काळात 'लाखों दिलों की धडकन' असलेल्या मीना कुमारी या स्वत: तीन तलाक पद्धतीच्या बळी ठरल्या होत्या. त्यांनी 'पाकिजा'चे दिग्दर्शक कमाल अमरोही यांच्याशी विवाह केला होता.


तलाक... तलाक... तलाक


एकदा रागानं चिडलेल्या कमाल अमरोहींनी काहीही विचार न करता तीन वेळा 'तलाक... तलाक... तलाक' म्हटलं आणि मीना कुमारी यांच्या पायाखालची जमीनच सरकली. 


भानावर आल्यावर अमरोहींना आपल्या तोंडून काहीतरी भलतंच निघून गेल्याची जाणीव झाली... पण, आपला 'तलाक' झाला आहे आणि आता ते पती-पत्नी राहिले नाहीत, यावर दोघांचाही विश्वास होता... कारण, दोघंही परंपरेनं बांधले गेले होते.


'हलाला'नं पुन्हा विवाह


दोघांनाही पुन्हा विवाह करायचा होता... पण, यात एक अडचण होती... एकदा 'तलाक' दिलेल्या पुरुषाशी पुन्हा निकाह करायचा असेल तर मुस्लिम स्त्रियांना 'हलाला' या परंपरेनुसार निकाह करावा लागतो. हलालानुसार एकदा तलाक झाल्यानंतर दुसऱ्या एका पुरुषाशी विवाह करून त्यानं तलाक दिल्यानंतरच स्त्री आपल्या पहिल्या पतीशी पुनर्विवाह करू शकते.


हीच पद्धत मीना कुमारी यांनाही मान्य करावी लागली. कमाल यांनी आपला मित्र अमान उल्लाह खान (झीनत अमानचे पिता) यांच्याशी मीनाकुमारीचा निकाह लावून दिला. त्यानंतर अमान यांनी तलाक दिल्यानंतर मीना कुमारी यांनी पुन्हा एकदा कमाल अमरोहींशी निकाह केला.


परंतु वैयक्तिक जीवनातील या अनपेक्षित प्रसंगानं मीना कुमारी पुरत्या कोलमडून गेल्या होत्या... त्या पुरत्या निराश झाल्या होत्या... त्यातच त्यांना दारुची सवय लागली... आणि अवघ्या ३० व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला.