Meena Kumari: आपल्या भारतीय चित्रपटसृष्टीत असा अनेक गायिका, अभिनेत्री होऊन गेल्या ज्यांची जोरात चर्चा रंगलेली पाहायला मिळाली होती. ज्यांच्या सौंदर्याचे सगळेच जण फॅन्स होते. त्यातील एक अभिनेत्री म्हणजे मीना कुमारी. त्या उत्कृष्ट अभिनेत्री तर होत्याच परंतु त्याचसोबत त्या गायिकाही होत्या. इतकं सुंदर आयुष्य लाभलेल्या या सुंदरीचा मात्र आयुष्याचा शेवट फारच वाईट झाला होता. तुम्हाला माहितीये का की त्यांना समोर पाहताच त्यांचे अनेक सहकलाकार हे डायलॉगही विसरून जायचे. त्यामुळे त्यांची जोरात चर्चा रंगलेली असायची. त्यामुळे तुम्ही कल्पना करू शकता की त्या किती सुंदर आणि लोकप्रिय होत्या. आज आपण त्यांच्याच आयुष्यातील काही इंटरेस्टिंग फॅक्ट्स जाणून घेणार आहोत. मीना कुमारी यांच्या सौंदर्याची आज पुन्हा एकदा तारीफ करायला काहीच हरकत नाही. 50-60 चे भारतीय चित्रपटसृष्टीतील ते दशक त्यांनी अक्षरक्ष: गाजवलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मीना कुमारी यांच्या जन्माच्या वेळी कुटुंबाकडे पैसेही नव्हते : 


मीना कुमारी यांच्या वडिलांचे नावं हे अली बख्श हे होते. ते पाकिस्तानमध्ये संगीताचे शिक्षण द्यायचे. त्यांनी उर्दू कवीही म्हटलं जायचं. त्यांच्या आईचं नावं हे प्रभावती देवी होते. त्या रंगकर्मी होत्या. जेव्हा मीना कुमारी यांचा जन्म झाला तेव्हा त्यांच्या डिलिव्हरीसाठी त्यांच्या कुटुंबाकडे पैसेही नव्हते. त्यांच्या आईवडिलांच्या लग्नानंतर त्यांची आर्थिक परिस्थिती ही फारच बिघडत गेली होती. 


चार वर्षांची असताना मीना कुमारी यांनी केली कामाला सुरूवात : 


त्यांच्या घरात त्यांची आर्थिक परिस्थिती ही फारच खराब होती. त्यासाठी त्यांच्या परिवारानं त्यांना वयाच्या 4 व्या वर्षीच चित्रपटांतून काम करण्यास सांगितले होते. त्यावेळी मग त्यांचे शिक्षण सुटले आणि मग त्यांच्यावर संपुर्ण घराची जबाबदारी पडली. बेबी मीना म्हणून लहान वयातच त्यांना चित्रपटातून काम मिळू लागले आणि याच नावानं त्या लोकप्रिय झाल्या. तेव्हा त्यांना काम मिळू लागले आणि मग त्यांच्या घरी पैसे येऊ लागले. 


मीना कुमारी यांचे सौंदर्य : 


1952 साली प्रदर्शित झालेल्या बैजू बावरा या चित्रपटातून त्या मीना कुमारी या संपुर्ण नावानं प्रेक्षकांसमोर आल्या होत्या. त्या जसजश्या मोठ्या होऊ लागल्या त्या प्रमाणे त्यांना अधिकाधिक लीड रोल्स मिळू लागले. 


कलाकार त्यांना पाहूनच संवाद विसरून जायचे : 


मीना कुमारी यांचे लाखो फॅन्स होते. त्यातील एक होते राजकुमार. राजकुमार तर त्यांना पाहताच डायलॉग विसरून जायचे. हा किस्सा होता पाकिजा या चित्रपटातला. 


जेव्हा गुंडांनी त्यांना घेरले : 


एकदा त्या कुठेतरी आपले पती कमाल अमरोही यांच्यासोबत जात होत्या. तेवढ्यात त्यांच्यावर गुंडाचा हल्ला झाला. परंतु त्यांना लुटण्याऐवजी मीना कुमारी यांच्याकडेच पाहत राहिले. खरंतर ते त्यांचे फॅन होते.