बॉलिवूडसोडून अमेरिकेत लग्न करून गेलेल्या मीनाक्षी शेषाद्रीला आल्या `या` अडचणी
मीनाक्षी शेषाद्री यांनी एका शोमध्ये हा खुलासा केला आहे.
मुंबई : 1980 आणि 90 च्या दशकात बॉलिवूडमध्ये राज्य करणाऱ्या मीनाक्षी शेषाद्री (Meenakshi Seshadri) यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. मीनाक्षी यांनी एकापेक्षा एक भूमिका साकारल्या. मीनाक्षी यांचे लाखो चाहते आहेत. पण काही काळानंतर मीनाक्षी या अचानक कुठे गायब झाल्या. त्यानंतर इतक्या वर्षांनंतर मीनाक्षी इंडियन आयडॉल या सिंगिंग रिअॅलिटी शोमध्ये दिसल्या. यावेळी मीनाक्षी यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले.
मीनाक्षी 'इंडियन आयडॉल' वर अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. मीनाक्षी यांनी इंडियन आयडलचे परिक्षक नेहा कक्कड, विशाल ददलानी आणि हिमेश रेशमिया याला त्यांच्या हातानं बनवलेलं साऊथ इंडियन फूड आणलं. लग्नानंतर अमेरिकेत गेलेल्या मीनाक्षी सुगरण कशा झाल्या ते सांगितलं.
मीनाक्षी यांनी 1995 मध्ये इंव्हेस्ट बँकर हरीश म्हैसूरशी लग्न केले आणि त्यांच्यासोबत यूएसला गेल्या. याविषयी सांगताना मीनाक्षी म्हणाल्या , 'मी यूएसला गेले, आई झाले, पत्नी झाले, सगळ काही झाले आणि सुगरणही झाले. आता मी म्हणू शकते की मी दक्षिण भारतीय पदार्थ खूप चांगले बनवते. (Meenakshi Seshadri Seen In Indian Idol 13 Says She Went To America And Became chef)
प्रोमोमध्ये देबोस्मिता 'जुर्म' चित्रपटातील मीनाक्षी यांचं हिट गाणं 'जब कोई बात बिगड जाये' गाताना दिसत आहे. हे गाणं विनोद खन्ना आणि मीनाक्षी यांच्यावर चित्रित करण्यात आले होते. हे गाणं कुमार सानू आणि साधना सरगम यांनी गायले होते. जेव्हा होस्ट आदित्य नारायणनं त्यांना विचारले की हे गाणं त्यांच्या पतीसाठी खूप रोमँटिक आहे का, तेव्हा मीनाक्षी म्हणाल्या की त्यांनी कधीही हे गाणं एकत्र ऐकले नाही.
दरम्यान, मीनाक्षी यांनी हिरो (1983), स्वाति (1986), दिलवाला (1986), इनाम दस हजार (1987), शहंशाह (1988), जुर्म (1990), घायल (1990), घर हो तो ऐसा (1990) यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. मीनाक्षी यांना दोन मुले आहेत.