मुंबई : 'मिकी वायरस' आणि 'किस किसको प्यार करूँ' सारख्या सिनेमांत दिसणारी अभिनेत्री एली अवराम 'नचदी फिरांगी' गाण्यात अगदी हॉट आणि बोल्ड दिसत आहे. या गाण्यात मीत ब्रदर्सने कनिका कपूरला मदत केली आहे. या गाण्यात तिचा देखील हॉट अंदाज पाहायला मिळत आहे. 


शूट करण्यात भरपूर मजा आली - एली 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मीत ब्रदर्ससोबत काम करण्याचा अनुभव एलीने शेअर केला आहे. गेल्या दोन वर्षांपासून आम्ही व्हिडिओत काम करण्यासाठी आतुर होतो. माझ्या या संगीत व्हिडिओसाठी संपर्क केला तेव्हा मला खूप आनंद झाला. जेव्हा मला कळलं की, कनिका देखील या गाण्याशी जोडली आहे तेव्हा मला शुटिंग करताना जास्त मजा येईल याचा अंदाज होतो. 



एली अवरामचं नाव गेल्या कित्येक दिवसांपासून टीम इंडियाच्या ऑल राऊंडर खेळाडू हार्दिक पांड्यासोबत जोडलं गेलं आहे. हार्दिक पांड्या आणि एली अवराम अनेकदा एकत्र दिसले आहेत.