मुंबई : दर दिवशी नव्याने काही गोष्टी समोर आणणाऱ्या सोशल मीडियाच्या वर्तुळात एक चेहरा नव्याने प्रकाशझोतात आला आहे. टीक- टॉक या माध्यमातून समोर आलेल्या त्या चेहऱ्याला पाहून प्रथमत: अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. अर्थात त्यामागचं कारणंही तसंच आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तरुणाईच्या गळ्यातील ताईत झालेल्या या ऍपची लोकप्रियता अशी काही वाढली आहे की विचारुन सोय नाही. मुख्य म्हणजे या लोकप्रियतेला जोड मिळाली आहे ती म्हणजे काही दर्दी रसिकांची. अशाच या रसिकांच्या घोळक्याने चक्क मधुबाला यांच्याप्रमाणेच हुबेहुब दिसणाऱ्या एका मुलीचा शोधलं आहे. 


आरस्पानी सौंदर्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या, दिवंगत अभिनेत्री मधुबाला यांच्या सौंदर्याची व्याख्या भल्याभल्यांना मांडता आली नाही. तसं धाडसंही कोणी केलं नाही. पण, टीक- टॉक नामक एका ऍपवर प्रियांका कंडवाल या मुलीचे मधुबाला यांच्या गीतावरील व्हिडिओ पाहून अनेकांना धक्काच बसला आहे.