मुंबई : साऊथ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता चिरंजीवीच्या निधनानंतर त्याची पत्नी मेघना राजने त्याच्यासाठी एक भावूक पोस्ट लिहिली आहे. ७ जून रोजी चिरंजीवीने अखेरचा श्वास घेतला. तो ३९ वर्षांचा होता. हृदयविकाराच्या झटक्याने या अभिनेत्याचं निधन झालं.  चिरंजीवी सारजा यांच्या निधनाने साऊथ इंडस्ट्रीमध्ये शोककळा पसरली आहे. सध्या त्याच्या पत्नीने लिहिलेली पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पतीच्या निधनानंतर मेघनाने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 'चिरू... मी पुन्हा प्रयत्न केला आहे. पण मी माझ्या भावना  व्यक्त करू शकत नाही. जगात या शब्दांचं वर्णन करणं फार कठीण आहे. माझा मित्र, प्रेमी, पती या सर्व नात्यांपेक्षा अधिक माझ्या जीवनात तुझं स्थान होतं. नेहमी मी दरवाजात तुझी वाट पाहत असते..' अशी भावूक पोस्ट मेघनाने लिहिली आहे. 


चिरंजीवी यांनी २००९ मध्ये वायूपूत्र या चित्रपटातून अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली होती. या चित्रपटासाठी त्यांना पुरस्कार देखील मिळाला होता. तसेच त्यांनी अम्मा आय लव्ह यू, राम लीला, चंद्रलेखा, चिरु या चित्रपटांमध्ये काम केले आहे. १२ मार्च रोजी प्रदर्शित झालेला शिवार्जुन हा अखेरचा चित्रपट ठरला आहे.