मुंबई : महमूद हे हिंदी चित्रपटातील एकमेव विनोदी अभिनेता होत ज्यांची उंची नायकांच्या वर होती. महमूद नेहमीच त्यांच्या स्टाईलसाठी ओळखले जायचे. त्या काळात त्यांना चित्रपटाच्या नायकापेक्षा जास्त फी दिली जायची. इतकंच नाही तर चित्रपटाला हिट करण्यासाठी पोस्टरवर महमूद यांचा फोटो लावणं अत्यंत महत्वाचं होतं. जेव्हा-जेव्हा महमूद यशाच्या उंचीवर पोहोचले तेव्हा ते कोणालाही मदत करण्यात मागे राहिले नाही. बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत. ज्यांचं आयुष्य महमूद यांनी बदलून टाकलं. 23 जुलै 2004 रोजी महमूद यांनी वयाच्या 71व्या वर्षी जगाला निरोप दिला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महानायक अमिताभ बच्चन महमूद यांना त्यांचे दुसरे वडील मानायचे. पण एकदा असं काही घडलं की, मेहमूद यांना फारच धक्का बसला. एका मुलाखतीत महमूद म्हणाले होते, 'आज माझा मुलगा अमिताभकडे चित्रपटांची लाईन आहे.


जो माणूस यशस्वी होतो त्या माणसाचे दोन वडील असतात - एक जन्म देणारा आणि दुसरा यशाचा मार्ग दाखवणारा. मी त्याला खूप मदत केली. बर्‍याच चित्रपटांमध्ये काम दिलं. मी त्याला माझ्या घरात राहायला जागा दिली.'


महमूद पुढे म्हणाले की, 'जरी अमिताभने माझा खूप आदर केला असला तरी, मात्र त्याच्या एका कृतीमुळे मला थोडासा धक्का बसला होता. जेव्हा त्याचे वडील हरिवंश राय बच्चन पडले, तेव्हा मी त्यांना पाहण्यासाठी अमिताभ बच्चन यांच्या घरी गेलो.



परंतु जेव्हा माझी बायपास शस्त्रक्रिया झाली. तेव्हा अमिताभ वडिलांसोबत ब्रीच कँडी रुग्णालयात आला पण तो मला भेटायला आला नाही. अमिताभने ते सिद्ध केलं की, खरे वडिल खरे असतात. खोटे वडील खोटेच असतात'


जुलै २००४मध्ये महमूद यांच्या निधनानंतर अमिताभ बच्चन यांनी लिहिलं की, 'अभिनेता म्हणून मला मार्गदर्शन करण्यास त्यांनी मला नेहमीच मदत केली. माझ्या कारकीर्दीच्या सुरुवातीच्या काळात महमूद यांनी मला फार  मदत केली होती.


ते पहिले निर्माते होते ज्यांनी मला 'बॉम्बे टू गोवा' मध्ये पहिला मुख्य भूमिका असलेला रोल दिला होता.  सलग फ्लॉप्सनंतर मी घरी परत जाण्याचा विचार केला, मग महमूद साहेबांचा भाऊ अनवर यांनी मला थांबवलं.'


'बॉम्बे टू गोवा' या चित्रपटाचा एक मजेशीर किस्सा आहे. अमिताभ बच्चन आणि महमूद यांच्यातील एक गाणं होतं 'देखा ना हाय रे सोचा ना' अमिताभ यांनी या गाण्यावर नाचवावे अशी मेहमूद यांची इच्छा होती.


अमिताभ यांना डान्स कसा करायचा हे माहित नव्हतं, ते महमूद यांना म्हणाले 'भाईजान मी नाचू शकणार नाही, पण महमूद यांना बिलकुल अमिताभ यांची दया आली नाही. ते म्हणाले की, जो चालतो तो नाचू शकतो. अमिताभ बरचं समजवल्यानंतर मेहमूद यांनी त्यांना नाचण्यास भाग पाडलं आणि हे गाणं सुपरहिट ठरलं.