Ravi Kishan : भोजपूरी अभिनेते आणि लोकसभा सदस्य रवि किशन हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी त्यांच्यावर सरळ चोरी केलेल्या आरोप करण्यात आला आहे. दोन वर्षांपुर्वीच सुशांत सिंग राजपूतच्या प्रकरणात कंगना राणौतप्रमाणे रवि किशन यांनीही बॉलीवूडवर घणाघाती वार केला होता. त्यावर त्यांच्यावरही अनेक आरोप झाले होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जया बच्चन यांनी रवि किशन आणि कंगना राणौत यांचे थेट नाव न घेता 'जिस थाली से खातें हैं उसी में छेद करते हैं' असे वक्तव्य करत त्यांच्यावर निशाणा साधला होता. 


हे प्रकरण कुठे निवळतंय तोच आता रवि किशन हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. चित्रपट दिग्दर्शक विनोद तिवारी यांनी रवि किशन यांच्यावर त्यांच्या चित्रपटाचे टायटल चोरल्याचा आरोप केला आहे. 


विनोद तिवारी यांनी 'गोरखपूर' या जिल्ह्यावर आधारित एक चित्रपट सहा वर्षांपुर्वीच आणला होता. त्या चित्रपटाचे नावं होते 'जिला गोरखपुर' परंतु आत्ताच काही दिवसांपुर्वी रवि किशन यांनी आपल्याही एका आगामी चित्रपटाचे पोस्टर इन्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यात त्या चित्रपटाचे नावं 'गोरखपूर' असे आहे. हे पोस्टर रिलिज झाल्यावर मात्र विनोदी तिवारी यांनी रवि किशन यांच्यावर आपले टायटल चोरी केल्याचा आरोप केला आहे. 


विनोद तिवारी यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी या नावाचा चित्रपट या अगोदरच केला असून आपल्या चित्रपटाच्या टायटल चोरले आहे. ते म्हणाले, ''मी 2016 सालीच माझ्या 'जिला गोरखपूर' या चित्रपटाची घोषणा केली होती. परंतु नुकतेच माझ्या लक्षात आले की रवि किशनही यावरच एक फिल्म करत आहेत. IMPPA (indian motion pictures producers association) रवि किशन यांच्या चित्रपटावरील टायटल मान्य करू शकत नाहीत कारण 'गोरखपूर' या टायटलचे राईट्स माझ्याकडे आहेत. त्यावरून हे स्पष्ट आहे की त्यांनी माझे टायटल चोरले आहे. 


रवि किशन यांच्यावर आरोप करताना विनोद तिवारी यांनी कबूलीही दिल्याचे समोर आले आहे, ते म्हणतात, ''खरंतर रवि किशनला ही गोष्ट माहित होती की मी 'गोरखपूर'वर चित्रपट करतोय, उलट आमच्या एका कॉमन मित्रानेच त्यांना ही गोष्ट सांगितली होती. रवि किशन यांचे हे कृत्य पाहून फारचं आश्चर्य झाले आहे. मी चित्रपटावर फार मेहनत घेतली आहे त्यामुळे मला त्यांच्याकडून स्पष्टीकरण हवंय. मी त्यांना याबाबत पर्सनल मेसेजही केला आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


रवि किशन यांचे स्पष्टीकरणः 
आपल्यावर लावलेल्या आरोपानंतर रवि किशन यांनीही खुलासा केला आहे, ''ठीक आहे याचा तपास करू. जर त्यांच्या टायटल रजिस्टर असेल तर आम्ही नाव घेणार नाही पण जर त्यांच्याकडे नसेल तर त्यांना रिकवेस्ट करू की टायटल न घेण्याबद्दल'', असे त्यांनी स्पष्ट केले.