मुंबई : आमीर खान प्रोडक्शनच्या 'सिक्रेट सुपरस्टार' या आगामी चित्रपटातील 'मेरी प्यार अम्मी है' हे गाणंदेखील रसिकांसमोर आले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भावनिक स्वरूपाच्या या गाण्याला ऐकल्यानंतर तुम्हांला नक्कीच आईची आठवण येईल. चौदा- पंधरा वयोगटातील मुलीला गायिका होण्याची इच्छा असते. पण तिचे वडील या स्वप्नाला साकार करण्यासाठी मदत करत नाहीत. 



 


या गाण्याचे बोल आणि चाल प्रेक्षकांना आवडत आहे. तसेच ज्या स्वरूपात हे गाणं शूट केलं आहे त्यानुसार सहाजिकच तुम्हांलाही तुमच्या आईसोबत घालवलेले काही क्षण आठवतील.


गायिका होण्याला वडीलांचा विरोध पाहता  जायरा वसीम ही किशोरवयीन मुलगी युट्युबच्या माध्यमातून आपल्यातील कला जगासमोर आणते. युट्युब गाणी प्रदर्शित करते पण तिची ओळख जगाला करून देत नाही. हळूहळू तिच्या गाण्याला रसिकांचा प्रतिसाद मिळतो. पण या प्रसिद्धीमधून आपली ओळखही जगा समोर येईल. हे टाळण्यासाठीच चित्रपटाचे नाव 'सीक्रेट सुपरस्टार' ठेवण्यात आले आहे. येत्या १९ ऑक्टोबरला हा चित्रपट रसिकांसमोर येईल.