`मर्सल` चित्रपटातील हा GST सीन इंटरनेटवर होतोय व्हायरल
तामिळ सुपरहीट सिनेमा `मर्सल` हा चित्रपट एकीकडे प्रेक्षकांच्या उत्तम प्रतिसादाने तुफान चालतोय.तर दुसरीकडे या चित्रपटाशी निगडीत वाद देखील वाढत आहे.
मुंबई : तामिळ सुपरहीट सिनेमा 'मर्सल' हा चित्रपट एकीकडे प्रेक्षकांच्या उत्तम प्रतिसादाने तुफान चालतोय.तर दुसरीकडे या चित्रपटाशी निगडीत वाद देखील वाढत आहे.
मर्सल चित्रपटामध्ये जीएसटी आणि नोटाबंदीवर नकारात्मक भाष्य करण्यात आले आहे. परिणामी या चित्रपटातील वादग्रस्त डायलॉग काढावे अशी मागणी भाजपा कार्यकर्त्यांनी केली आहे.
भाजपाच्या वाढत्या दबावापुढे झुकून निर्मात्यांनी माफी पत्रही जाहीर केले आहे. पण नेमक्या कोणत्या डायलॉगवरून हा वाद सुरू झाला आहे याबाबातचा एक व्हिडिओ सोशल मीडियामध्ये झपाट्याने व्हायरल होत आहे.
भाजपाने या डायलॉगवर आक्षेप घेतला असला तरीही राहुल गांधीसह अभिनेते कमल हसन, रजनीकांत यांनी पाठिंबा दर्शवला आहे. तर नरसिंह राव या भाजपाच्या प्रवक्त्यांनी कलाकारांवर टीका केल्यानंतर अभिनेता, दिग्दर्शक फरहान अख्तरही भडकला होता. त्याने ट्विटरवर प्रत्युत्तर दिले होते.