मुंबई : कला जगतामध्ये काही कार्यक्रम आणि सोहळे हे कायमच चाहत्यांसाठी आणि खुद्द कलाकारांसाठीही कुतूहल जागवणारे ठरतात. अशाच सोहळ्यांतील एक नाव म्हणजे मेट गाला. Met Gala 2021 मेट गालाच्या रेड कार्पेटवर फॅशनची परिभाषा बदण्यारे अनेक मापदंड पाहायला मिळतात. हा जणू अलिखित इतिहासच. यंदाही त्याचीच पुनरावृत्ती झाल्याचं पाहायला मिळाली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विविध सेलिब्रिटींनी Met Gala 2021च्या निमित्तानं चौकटीबद्ध फॅशन सेन्सला शह देत काही नव्या संकल्पनांचा अवलंब करण्यास सुरुवात केली. यामध्ये एक सौंदर्यवती रेड कार्पेटवर आली, तिनं आपल्या लूकनं सर्वांच्या नजराही वळवल्या आणि चेहरा न दाखवताच तिनं सर्वांची मनंही जिंकली. 


अंडरकव्हर लूकमध्ये आलेली ही सेलिब्रिटी होती, रिअॅलिटी टीव्ही स्टार किम कार्दशियन (kim kardashian). मंगळवारी तिनं या सोहळ्याला हजेरी लावली. यावेळी डोक्यापासून पायांच्या नखांपर्यंत तिनं काळ्या रंगाच्या स्किनफीट आऊयफीटमध्ये स्वत:ला जणू झालकंच होतं. 




किमनं कलादिग्दर्शक Demna Gvasalia नं परिस बेस्ड हाय फॅशन लेबलसाठी डिझढाईन केलेल्या ड्रेसला प्राधान्य दिलं होतं. ज्यामध्ये कर्व्ह टीशर्टवर काळ्या रंगाचा टीशर्ट आणि बॉडीसूट अशा आऊटफिटचा समावेश होता. हेअरस्टाईलसाठी तिनं लांबलचक पोनीटेलला प्राधान्य दिलं होतं. किमचा हा लूक सोशल मीडियावर चांगलाच गाजला. 








फक्त किम नव्हे तर इतरही अनेक सेलिब्रिटींनी मेट गालाच्या रेड कार्टेवर येण्यासाठी अफलातून लूक्सना पसंती दिली होती. फॅशन डिझायनर्सची कलाकारी आणि या लूकला कॅरी करण्याचा सेलिब्रिटींचा आत्मविश्वास पाहता मेट गालाची ही थेट फॅशन यंदाजी गाजली असं म्हणायला हरकत नाही.