मुंबई : देशात सुरू असलेल्या #Metoo चळवळीत अनेक महिलांनी आपल्यावरील लैंगिक अत्याचाराचे अनुभव शेअर करणे सुरू केलं आहे. यात अनेक प्रसिद्ध व्यक्ती घेरल्या जात आहेत. #Metoo चळवळीत पहिल्यांदा महिला समलैंगिक प्रकरण समोर आलं आहे. महिला कॉमेडियन कनीज सुरका यांनी ट्विटरवर एक मोठी पोस्ट लिहून, दुसरी महिला कॉमेडीयन आदिती मित्तलवर लैंगिक अत्याचाराच आरोप केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कनीजने आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं आहे, माझ्यासोबत जे झालं ते सांगणं अतिशय महत्वाचं आहे, दोन वर्षाआधी अंधेरी बेसवर जवळजवळ १०० प्रेक्षकांसमोर आणि काही कॉममेडियन्समोर एक कॉमेडी शो मी करत होती. 


तेव्हा अचानाक आदिती मित्तल जागेवरून उठून माझ्या जागी आली आणि माझी इच्छा नसताना मला जबरदस्ती किस केला.


कनीजने लिहिलं आहे की, यावेळी आदितीने तिच्या तोंडात आपली जिभ लावली. ही वेळ माझ्यासाठी खूप लाजीरवाणी होती. 


प्रत्येक व्यक्तीसाठी आपली आवड आणि त्याला काही बंधनं आहेत, पण माझ्या प्रकरणात आदितीने हे सर्व तोडून मोडून लावल्यासारखं आहे.


कनीजने पुढे लिहिलं आहे की, आदिती मित्तलवर MeToo चळवळीत आवाज उठवल्याने आपल्याला हिरो म्हटलं जात आहे, ते मला अधिक सतावणारं आहे. 


मी आमच्या एका संयुक्त मित्राकडून याबाबतीत त्यांना याप्रकरणी माफी मांगण्यास सांगितलं, पण त्यांनी पुन्हा एकदा तपासून पाहा, अस सांगत ही मागणी झुगारून लावली.


तिने लिहिलं आहे की, माझ्याकडे पुरावे आहेत, लोक पीडितावर विश्वास करतात. आदितीने जे केलं ते त्रासदायक आहे, यामुळे मला हे पाऊल उचलावं लागत आहे, पण जर ती माझी जाहीर माफी मागत असेल तर मी हे इथेच विसरून जाईन.