मुंबई : गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड इंडस्ट्रीत #metoo चवळवळीने अगदी जोर पकडला आहे. अभिनेत्री तनुश्री दत्तापासून सुरू झालेली ही चळवळ आता काही थांबायच नाव घेत नाही. #metoo च्या अंतर्गत तनुश्री दत्ता, कंगना रानावत आणि निर्माता विंटा नंदासोबत अनेक महिला कलाकारांनी आपल्या सहकलाकार, दिग्दर्शक - निर्माता यांच्याबाबात लैंगिक अत्याचाराच्या अनेक गोष्टी समोर आणल्या. आता अगदी सुरूवातीपासून वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या 'सेक्रेड गेम्स'चा देखील उल्लेख आहे. सेक्रेड गेम्सच्या लेखकावर लैंगिक अत्याचाराचा आरोप आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लेखक आणि कॉमेडिअन असलेल्या वरूण ग्रोवरवर एका महिलेने लैंगिक अत्याचाराचा आरोप लावला आहे. पीडित महिलेने 17 वर्षांपूर्वीची घटना सांगत हा आरोप लावला आहे. महिलेनुसार, ही घटना 2001 मधीस असून वरूण तेव्ही बीएचययूमध्ये शिक्षण घेत होता. तेव्हा त्याने एका नाटकाच्या तालमीचे निमित्त सांगून माझं लैंगिक शोषण केलं. 



महिलेच्या या आरोपानंतर वरूण ग्रोवरने अगदी तात्काळ ट्विट करून प्रतिक्रिया दिली. महिलेचे हे आरोप फेटाळत चार पानांच आपलं मत मांडलं. त्याने म्हटलं की, आतापर्यंत कोणत्याही व्यक्तीला त्याने चुकीच्या पद्धतीने स्पर्श केलेला नाी. आपल्या कॉलेजमध्ये आपण दोनच प्ले केले होते ज्याचं मी दिग्दर्शन केलं होतं. महिलेने ज्या म्युझिक क्लबचा उल्लेख केला तिथे मी कधी गेलोच नाही. 



त्यानंतर वरूण ग्रोवरच्या समर्थनाकरता अनुराग कश्यप आणि नीरज घायवान आले. अनुरागने सांगितलं की, मी वरूणला खूप वर्षांपासून ओळखतो. ज्या महिलेने हा घाणेरडा आरोप लावला आहे तो चुकीचा आहे. अशा आरोपांची कसून चौकशी व्हायला हवी.