मुंबई : बॉलिवूड लोकप्रिय गायक मिका सिंगचा दुल्हनियाच्या शो संपला आहे. 'स्वयंवर: मिका दी वोटी' या रिअॅलिटी शोच्या माध्यमातून त्याने आपली जुनी मैत्रिण आणि अभिनेत्री आकांक्षा पुरी हिची जीवनसाथी म्हणून निवड केली आहे. मिकाच्या निर्णयावर या जोडप्याचे चाहते खूश आहेत, तर काही नेटकऱ्यांनी दोघांना 'मिस मॅच्ड पेअर' म्हणत ट्रोल केले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'स्टार भारत' वर दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या 'मिका दी वोटी'चा शेवटचा भाग 25 जुलै 2022 रोजी प्रदर्शित झाला होता. यावेळी मिकाला तीन फायनलिस्टपैकी एका मुलीची निवड जीवनलाथी म्हणून करायची होती. या तीन फायनलिस्ट आकांक्षा पुरी, नीत महल आणि प्रान्तिका दास होती. या तिघांमधून मिकानं साथीदजार म्हणून आकांक्षाची निवड केली. आता अशा चर्चा आहेत की दोघे लवकरच पंजाबी 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


 जिथे मिकाला तीन फायनलिस्टपैकी एकाची निवड करायची होती आकांक्षा पुरी, नीत महल. आणि प्रान्तिका दास होती. इथे मिकाने आपल्या मित्राला आपला साथीदार बनवण्याचा निर्णय घेत आकांक्षाच्या गळ्यात माळ घातली. आता बातमी आहे की, दोघेही लवकरच पंजाबी परंपरेनुसार लग्नबंधनात अडकणार आहेत. आकांक्षा पुरीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून काही फोटो शेअर करत एक नवीन सुरुवात करत असल्याचे सांगितले आहे. 


25 जुलै 2022 रोजी संध्याकाळी, शो संपल्यानंतर, हे दोघं मुंबईत डेट नाईटवर जाताना दिसले. यादरम्यान मिकाने निळ्या शर्टसह काळ्या रंगाचं ब्लेजर परिधान केलं आहे. ज्यामध्ये तो खूपच डॅशिंग दिसत होता. त्याचवेळी आकांक्षा गुलाबी रंगाच्या चमकदार ड्रेस परिधान केला आहे. या दोघांना एकत्र पाहून चाहत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. मात्र, असे काही लोक आहेत ज्यांना ही जोडी अजिबात आवडली नाही आणि त्यांनी या जोडप्याला ट्रोल केलं इतकचं काय तर शोला स्क्रिप्टेड म्हटलं.



हा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होताच, नेटकऱ्यांनी त्या दोघांना ट्रोल केलं आहे. एक नेटकरी म्हणाला, 'ती खूप उंच आहे, पण ते एकमेकांचे कौतुक करत नाहीत, केमिस्ट्री नाही.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'हा स्क्रिप्टेड शो आहे आणि हे सगळं आधीच ठरवलं होतं. ते दोघे रिलेशनशिपमध्ये होते.' 


आकांक्षा पुरी आणि मिका 13 वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. मध्यंतरी या दोघांच्या अफेअरचीही खूप चर्चा रंगली होती. मात्र, तेव्हा ते याबद्दल बोलले नाहीत, पण आता शोच्या माध्यमातून आकांक्षाने मिकावरचे प्रेम व्यक्त केले असून मिकानेही आकांक्षाला सोबती म्हणून निवडले आहे.