Mika Singh: बॉलिवूडमध्ये एकमेकांना गिफ्ट्स देणं काही नवं नाही. त्यामुळे अशावेळी चर्चा असते ती म्हणजे त्यांच्या (सेलिब्रेटींच्या) महागड्या गिफ्ट्सची. अशाच एका लोकप्रिय गायकानं दिलेल्या गिफ्टची सर्वत्र चर्चा आहे. तुम्हाला गिफ्ट काय दिलंय हे जाणून घेतल्यानंतर फार काही आश्चर्य वाटणार नाही. परंतु यावेळी मिका सिंग मात्र चांगलाच ट्रोल झाला आहे. मिका सिंग हा बॉलिवूडचा लोकप्रिय गायक आहे. त्यातून त्याची सोशल मीडियावर अनेकदा चर्चा रंगलेली असते. यावेळी त्याला त्यानं आपल्या मित्राला गिफ्ट केलेल्या 4 कोटींच्या फ्लॅट्सवरून सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलंय. टॅक्स वाचवण्यासाठी त्यानं हे गिफ्ट त्याला दिलं असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरू झाल्या आहेत. मिका सिंग यांच्याकडे फार मोठी प्रोपर्टी आहे. त्यातून इतकं महागडं गिफ्ट मित्राला देणं हे तर त्याच्यासाठी काही कठीण नाही, पण तरीही त्याला सोशल मीडियावर टोमणे ऐकावे लागले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी त्याचा मित्र कनवालजित सिंग याला त्यानं मर्सिडीज-बेन्ज GL Class गाडी आणि दिल्ली व मुंबईमध्ये दोन फ्लॅट्स दिले आहेत. विरल भयानीनं हा रिपोर्ट दिला आहे. आपल्या मित्राच्या वाढदिवसाच्या दिवशी मिका सिंग यानं ही भेटवस्तू दिली असल्याचे या रिपोर्टमधून समोर आलं आहे. यावेळी सोशल मीडियावर नानातऱ्हेच्या कमेंट्स येयला सुरूवात झाली आहे. नेटकऱ्यांनी त्याला प्रचंड प्रमाणात ट्रोल करण्यात आले आहे. त्याच्या या गिफ्टची एकप्रकारे खिल्लीच उडवण्यात आली आहे. जर तुमचे उत्पन्न (Income) जास्त असेल तर त्यावरील टॅक्स (Tax) वाचवण्याचा सोप्पा उपाय काय? तर ते म्हणजे हे पैसे कुठेतरी दुसरीकडे साठावायचे अथवा खर्च करायचे. मग खर्च करायचे तर त्याचा हिशोब म्हणून, 'मी कंपनी उघडली', 'अमुकला भेट दिले' इत्यादी फंडे. 


हेही वाचा : 'त्यांची तेवढी...', What Jhumka? गाण्यावर आशा भोसले संतापल्या


अनेकांनी मिका सिंगला यावरूनच खडसावले आहे, त्यापेक्षा त्याला ट्रोल केले आहे. सुजाण नेटकरी यावेळी म्हणाले की, ''काही बेस्ट फ्रेंड वैगेरे नाही, हे तर सगळं टॅक्स वाचवण्यासाठी आहे.'' तर दुसऱ्या एकानं लिहिलंय की, ''हे सगळं काही टॅक्स वाचवण्यासाठी''. तर एकानं असं लिहिलंय की, ''सीएनं सांगितलं असेल''. अशा अनेक कमेंट्स यावेळी आलेल्या आहेत. मिका सिंग याची अनेकदा चर्चा रंगलेली असते. त्यामुळे आताही त्याची जोरात चर्चा सुरू आहे. 



मागे एकदा राखी सावंतला बळजबरीनं कीस केल्यामुळे तो चांगलाच चर्चेत आलेला होता. त्यानंतर आता राखी आणि त्याच्यात खूप चांगलं नातं आहे. सोबतच तिनं त्याच्यावर याच प्रकारावरून केलेली केसही मागे घेतली आहे.