Asha Bhosale on Jhumka Song: 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा चित्रपट सध्या सर्वत्र गाजतो आहे. त्यामुळे त्याची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. यावेळी या चित्रपटातील गाणीही बरीच गाजताना दिसत आहेत. या चित्रपटातील What Jhumka? हे गाणं सध्या सर्वत्र गाजताना दिसतंय. या गाण्यावर अनेकांनी भन्नाट रिल्सही केले आहेत. सोशल मीडियावर म्हणून या रिल्सची चांगलीच हवा रंगते आहे. हे गाणं पहिल्यांदा 1966 साली आले होते. 'मेरा साया' या चित्रपटातील हे गाणं आहे जे खुद्द आशा भोसले यांनी स्वरबद्ध केले होते. या गाण्याची किमया ही आजही कायम आहे. सध्या या गाण्यानं सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. आजही अनेक जण आपल्या तोंडी हे गाणं गुणगुणताना दिसतात. यावेळी 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटाच्या संगीताकारांनाही या गाण्याचा मोह झालेला राहावला नाही आणि त्यांनीही हे गाणं त्यांच्या स्टाईलमध्ये 'रिक्रियेट' केलं आहे.
यावेळी Rocky Aur Rani Ki Prem Kahani या चित्रपटातील What Jhumka या गाण्यावर ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'इंडिया टूडे'च्या मुलाखतीत त्या म्हणाल्या की, ''काळ हा खूप वेगानं पुढे जातो आहे. त्यातून तो यापुढेही बदलत राहणार आहे. मी-तुम्ही हे थांबवू शकत नाही. आजच्या संगीतकारांमध्ये ती क्षमता नाही. त्यामुळे ते जुनी गाणी परत नव्यानं बनवत आहेत. 'झुमका गिरा रे' हे गाणं केवढे चाललेले होते. आजही लोकप्रिय आहेत. आता हे गाणं नव्या चित्रपटात आलं आहे. हे तर फारच जूनं गाणं आहे.''
हेही वाचा : कुकरमध्ये लावलेला भात शिजवताना बाहेर येतो? या सोप्या उपायाने दूर होईल समस्या
पुढे त्या असं म्हणाल्या की, ''या गाण्यांमध्ये बोल आहेत. आवाज पण आहे. म्युझिक पण आहे. या तीनही गोष्टींचे मिश्रण म्हणजे या तीनही गोष्टी आहेत. हे एवढंच नाही. जर चित्रपट शूट करणारा तो नीट शूट करत नसेल चित्रपट चांगला होणार नाही. हे टीम वर्क आहे. सर्व काही एकत्रितपणे होयला पाहिजे.''
त्या पुढे असंही म्हणाल्या की, ''जुन्या गाण्यांमध्ये मेहनत होती. जेव्हा गीतकार आणि संगीतकार एकत्र बसायचे तेव्हा मात्र त्यांच्यात सल्लामसल्लत असायची. कोणता शब्द हवा आहे कोणता नाही. दोघंही दोन्ही बाजूनं खूप मेहनत करायचे.'' यावेळी त्यांनी एका गाण्याचे उदाहरणही दिले.