मुंबई : शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानचं नाव ड्रग्स प्रकरणात समोर आलं. यानंतर त्याला आर्थर रोड कारागृहात ठेवण्यात आलं. आज आर्यन खानच्या प्रकरणावर उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. आर्यन खानला अनेकांनी विरोध केला तर तेवढ्याच प्रमाणात त्याला पाठिंबा देखील मिळत आहे. आता आर्यन खानच्या सपोर्टकरता Mika Singh समोर आला आहे. मिका सिंगने संजय गुप्ता (Sanjay Gupta) यांच बोलणं खरं असल्याचं ट्विट केलंय. त्याने आर्यनला पाठिंबा दिला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान गेल्या अनेक दिवसांपासून तुरुंगात आहे. 2 ऑक्टोबर रोजी मुंबईत एनसीबीने रेव्ह पार्टीवर छापा टाकला होता. ज्यामध्ये आर्यन खानसह सात जणांना अटक करण्यात आली होती. या सर्वांवर अंमली पदार्थांचे सेवन करून एकत्र ठेवल्याचा आरोप आहे. यानंतर फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित अनेकांनी शाहरुख आणि त्याच्या मुलाला पाठिंबा दिला. तर त्याच बरोबर शाहरुख खानचे खूप खास असलेले असे अनेक लोक या प्रकरणी मौन बाळगून आहेत. अशा परिस्थितीत आता प्रसिद्ध बॉलिवूड गायक मिका सिंगने अशा लोकांवर निशाणा साधला आहे.


संजय गुप्ताच्या या ट्विटला मिका सिंगने रिट्विट करत लिहिले, 'तुम्ही अगदी बरोबर आहात. ते सर्व नाटक पाहत आहेत आणि एक शब्दही उच्चारत नाहीत. मी शाहरुख खानसोबत आहे. आर्यन खानला जामीन मिळावा. मला वाटतं इंडस्ट्रीतील प्रत्येकाच्या मुलाने एकदा आत जाव, मग ते ऐक्य दाखवतील.



चित्रपट निर्माते संजय गुप्ता यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, 'शाहरुख खानने इंडस्ट्रीत हजारो लोकांना रोजगार दिला आहे आणि देत आहे. तो नेहमीच चित्रपटसृष्टीच्या पाठीशी उभा राहिला आहे. या संकटाच्या काळात चित्रपटसृष्टीने जाणीवपूर्वक मौन बाळगणे हे लज्जास्पद आहे. दुसऱ्या ट्विटमध्ये संजयने लिहिले - आज त्यांचा मुलगा आहे. उद्या माझा किंवा तुझा असेल. असे असतानाही तू या उद्धटपणाने गप्प बसशील का?'



त्यामुळे पुन्हा एकदा आर्यनच्या बाजूने आणि आर्यनच्या विरोधात असा वाद सुरू झाला आहे. आज 26 ऑक्टोबर रोजी आर्यनच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे.