Milind Gawali's Post For Daughter : वडील आणि त्यांची लेक म्हणजे एक वेगळच नात, एक वेगळीच दुनिया म्हणायला हरकत नाही. वडील नेहमीच त्यांच्या मुलीसोबत दिसतात. कधी तिच्या शाळेच्या कार्यक्रमांमध्ये तर कधी ग्रॅज्युएशन सेरेमनी तर कधी नोकरीला लागल्यानंतर होणाऱ्या मोठ्या सेलिब्रेशनमध्ये देखील. प्रत्येक ठिकाणी वडील मुलीसोबत असतात. नेहमी वडिलांकडून काही शिकणारी लेक जेव्हा वडिलांना काही चांगल्या गोष्टी शिकवते तेव्हा वडिलांना कसं वाटतं हे छोट्या पडद्यावरील आई कुठे काय करते या मालिकेतील अनिरुद्ध म्हणजेच मिलिंद गवळी यांनी सांगितले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिलिंद गवळी यांनी राजश्री मराठीला नुकतीच ही मुलाखत दिली होती. याविषयी सांगत त्यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट देखील शेअर केली आहे. मिलिंद गवळी यांनी यावेळी एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ते वर्कआऊट करताना दिसत आहेत. अशात मिलिंद यांनी कॅप्शन दिलं की 'तुमचं प्रॉफेशन असं निवडा जे करायला तुम्हाला आवडेल आणि मग तुम्हाला आयुष्याच कधीच काम करायची गरज भासणार नाही. व्यवसाय असा शोधा की आयुष्यभर आपल्याला काम करावंच लागणार नाही. आपण आपल्या मुलांना त्यांच्या लहानपणापासून खूप काही शिकवत असतो, पण आपल्याला कळतच नाही की आपली मुलं कधी मोठी होतात आणि आपल्यालाच त्यांच्याकडून शिकायला लागतं, या मुलाखतीमध्ये मिथिला म्हणाली की 'मी हे प्रोफेशनची यासाठी निवड केली की दिवसभराच्या कामानंतर मला स्ट्रेस नको होतं ,तर शांत झोप हवी होती,' ही गोष्ट मी तिला शिकवायची राहून गेली होती, कारण माझ्या उमेदीच्या काळात ही इतकी महत्त्वाची गोष्ट मलाच ठाऊक नव्हती, इतक्या गोष्टी मी आयुष्यात केल्या, पण हा विचार करायचा राहूनच गेला, सुदैवाने ज्या गोष्टीवर माझे इतकं प्रेम आहे, ज्या गोष्टीची मला लहानपणापासून आवड आहे आणि ते म्हणजे ॲक्टिंग, आणि नकळतपणे त्यालाच प्रोफेशन म्हणून घेतल्यामुळे मला आयुष्यभर छान झोप लागली.'


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


हेही वाचा : विशाखा सुभेदारच्या जागी 'हास्यजत्रेत' आलेल्या 'या' अभिनेत्रीसाठी Samir Choughule ची खास पोस्ट


पुढे ते म्हणाले की 'असं म्हणतात की दिवसभरात इतकं माणसाने काम करावं की रात्री अंथरुणावर पडल्या पडल्या मेल्यासारखी झोप लागायला हवी, आपण पैसे मिळवण्यासाठी एखाद काम निवडतो आणि पैसे पण भरपूर मिळतात पण खूप स्ट्रेस येऊन माणसाची झोपच उडते, मिथिलाशी गप्पा मारून मी खूपच शिकलो आणि भारावून पण गेलो, हे एवढेस पिल्लू जिला मी तिच्या जन्मा वर अवघ्या 35 मिनिटांत लगेच कुशीत घेतलं होतं, नाजूक कापसाचा गोळा जसा, तिच आता इतकी स्ट्रॉंग झाली आहे, फक्त फिजिकली नाही तर मेंटली मेंटली सुद्धा. आता जाणीव व्हायला लागली की आता या मुलीला शिकवायची नाही तर तिच्याकडून शिकायची आपल्यालाच गरज आहे. आपलं शरीर सुदृढ असणं, निरोगी असणं किती गरजेचा आहे आणि आपलं शरीरच हा आयुष्याचा प्रवास आपल्याला घडवणार आहे, आणि तो आपल्या आयुष्याचा प्रवास फुल ऑफ एनर्जी फूल ऑफ एनर्जी आणि आनंदाने घडत असेल, तर तो सुखकारक नक्कीच होणार, त्यामुळे आपल्या शरीरात नको असलेले एक्स्ट्रा बॅगेज काढून टाकणे गरजेचे आहे, आणि ते जर आपल्याला जमत नसेल, तर मिथिला सारखा एखादा कोच शोधा, आणि आपल्या आयुष्याच्या नवीन प्रवासाला सुरुवात करा. मी नशीबवान आहे की मला माझा हा कोच, माझ्याच घरी सापडला आहे.