Maharashtrachi Hasyajatra Samir Choughule : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा कार्यक्रम सगळ्यांच्या मनावर राज्य करतोय. या कार्यक्रमानं सगळ्यां हसून हसून वेड केलं आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यांच्या स्कीटच व्हिडीओ हे नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचे पाहता. या कार्यक्रमातील सगळेच कलाकार हे लोकप्रिय आहेत. मात्र, या कार्यक्रमातील अभिनेता समीर चौगुले आणि विशाखा सुभेदार यांची जोडी तर आजही प्रेक्षकांच्या लक्षात राहिलेली आहे. विशाखानं गेल्या वर्षा महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम सोडला. विशाखा गेल्यानंतर सगळ्यांना आता तिच्या जागी कोण येणार आणि आलं तर विशाखा इतकं चांगलं स्कीट करणार का? असा प्रश्न होता. दरम्यान, विशाखाच्या जागी या कार्यक्रमात अभिनेत्री ईशा डे. नं एन्ट्री केली. आज ईशाचा वाढदिवस आहे. त्यानिमित्तानं समीर चौगुलेनं तिच्यासाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे.
समीर चौगुलेनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये समीर आणि ईशा डे. नं मिठी मारल्याचे दिसत आहे. ते दोघं मस्त निसर्गाच्या सानिध्यात आहेत. हा फोटो शेअर करत समीर चौगुले म्हणाला, 'वाढदिवसाच्या शुभेच्छा..... इशा... गेल्यावर्षीच आमच्या हास्यजत्रेच्या चमूत दाखल झालेला तगडा गडी... फारच कमी वेळात हिने हास्यजत्रेच्या वातावरणाशी जुळवून घेतलं... सहज सुंदर विनोदाची शैली आणि अत्यंत अप्रतिम आवाजाची दैवी देणगी लाभलेली आमची इशा ही लंडन ड्रामा ग्रॅज्युएट आहे...अगदी ब्रिटिशांचं इंग्रजी बोलू शकणारी आमच्या हास्यजत्रेतली ही एकमेव कलाकार... हिच्या "डे" आडनावावरून ही लोकांना बंगाली वाटते पण ही महाराष्ट्रीयनच आहे ...पण मग ती "डे" आडनाव का लावते हा प्रश्न कृपया तिलाच विचारावा.....स्वभावाने लोभस आणि तितकाच खट्याळपणा (किडे) जोपासणारी........ आयुष्यात थोडं चांगलं किंवा थोडं मन हलवणार समोर घडलं की लगेच हिचे डोळे पाणवतात... कदाचित हळवेपणा हेच तिच्या स्वाभाविक अभिनयाचं मूळ आहे..आमच्या दोघांची जोडी स्किट मध्ये बेफाम फुलते......इशा.. तुला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा...' असं कॅप्शन समीरनं दिलं आहे.
हेही वाचा : गरोदरपणानंतर 10 दिवसात 10 किलो वजन कमी, Gauahar Khan नं करुन दाखवलं
समीर चौगुलेनं शेअर केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. त्याच्या पोस्टनं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. अनेकांनी समीरच्या या पोस्टवर इशाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तर एका नेटकऱ्यांनी समीरच्या लेखनाचं कौतुक करत कमेंट केली की 'सगळ्यांच कौतुक तुम्ही मस्त शब्दात करतात. त्यामुळे आम्हाला पण वाचायला मस्त वाटत. तुमची लेखन पद्धती आम्हाला आवडली