मुंबई : अभिनेता मिलिंद सोमण सध्या आपल्या प्रोफेशनल लाइफपेक्षा पर्सनल आयुष्यामुळे खूप चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर पत्नी अंकिता कंवरसोबत त्याची खास बॉन्डिंग पाहायला मिते. मिलिंदने नुकताच अंकितासोबत एक व्हिडिओ शेअर केला आहे जो आता खूप चर्चेत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकतेच दोघे लेह फिरून आले आहेत. या ठिकाणचा व्हिडिओ मिलिंद सोमणने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओत मिलिंद आणि अंकिताने चांगला वेळ घालवल्याचं दिसत आहे. 



यासोबतच आणखी एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये हे दोघे एकमेकांसोबत चालताना दिसत आहे. कॅप्शन लिहिताना म्हटलं आहे, जे तुम्हाला करावंस वाटतं ते करा.



व्हिडिओत दोघं एकमेकांसोबत डान्स करताना दिसतात. तसेच या दोघांनी एकमेकांना किस केल्याचं देखील समोर आलं आहे. या व्हिडिओत दोघांच खास बॉन्डिंग दिसत आहे. मिलिंदने या व्हिडिओला कॅप्शन दिली आहे की, रोहतांगमध्ये फन टाइम... मनाली ते लेह. दोघांचे असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतात. दोघं अनेकदा एक्सरसाइज करताना दिसतात.