आमिरच्या #BoycottLalSinghChadha वर मिलिंद सोमणचं खळबळजनक वक्तव्य, म्हणाला...
अभिनेत्यानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे.
मुंबई : बॉलिवूडचा मिस्टर पर्फेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा अभिनेता आमिर खान हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. नुकताच आमिरचा 'लाल सिंग चड्ढा' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला समीक्षकांसोबतच प्रेक्षकांनकडून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच, चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाल्यापासून सोशल मीडियावर 'बॉयकॉट लाल सिंग चड्ढा' ट्रेंड करत होतं. त्यामुळे नेटकऱ्यांकडून चित्रपटाला तिरस्काराचा सामना करावा लागला. हे पाहता अनेक सेलिब्रिटी आमिरच्या समर्थनार्थ पुढे आहे. हे सगळं पाहता आमिरनं कोणताही निर्णय घेण्याआधी चित्रपट पाहण्याची विनंती केली.
आणखी वाचा : कॉलेजमध्ये असताना कोणी प्रपोज केलं का? पंकजा मुंडेंनी केला खुलासा
आता अभिनेता आणि सुपर मॉडल मिलिंद सोमणनं या प्रकरणावर त्याचं मत मांडत आमिरला पाठिंबा दिला आहे. मीडियाशी बोलताना मिलिंद म्हणाला, ट्रोल्स चांगल्या चित्रपटाला रोखू शकत नाहीत. निर्मात्यांनी त्यांच्या स्क्रिप्टवर अजून काम करायला हवे. जेणेकरून सोशल मीडियावर नकारात्मक कमेंट आल्या तर प्रेक्षक त्याकडे दुर्लक्ष करतील.
आणखी वाचा : याला म्हणताता मैत्री! मित्राला नोकरी मिळावी म्हणून त्याने... 1985 चं पत्र होतय सोशल मीडियावर व्हायरल
'बॉलिवूड बॉयकॉट' या हॅशटॅगने सोशल मीडियावर एक ट्रेंड सुरू आहे. 'लाल सिंग चड्ढा'वर बहिष्कार घालण्याचा प्रयत्न सुरू आहेत. बॉलीवूडबद्दल इतका द्वेष का आहे आणि तो थांबवण्यासाठी काय करण्याची गरज आहे? या प्रश्नावर बोलताना मिलिंद म्हणाला, "प्रत्येकाला सर्वच गोष्टींशी आवडतील असं होऊ शकत नाही. तुम्हाला एखादा चित्रपट आवडतो, पण दुसऱ्याला तो आवडेलच असं नाही. आज लोकांकडे त्यांचं मत मांडता येतं म्हणून ते काहीही बोलतील.
आणखी वाचा : 'हर हर शंभू' फेम फरमानी नाझचं गाणं Youtube वरून हटवण्याचं कारण समोर, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
पुढे मिलिंद म्हणाला, 'जर काही लोकांना एखादी व्यक्ती आवडत नसेल तर ते म्हणतील की आम्हाला ही व्यक्ती आवडत नाही. जर त्यांना एखाद्याचे विचार आवडत नसतील, तर ते म्हणतील की आम्हाला या व्यक्तीचे विचार आवडत नाहीत. काही लोकांना राजकारणी आवडत नाहीत, तर काही बोलतील आम्हाला हा राजनेता आवडतो. पण मी जसं ट्वीट केलं त्याप्रमाणे, ट्रोल चित्रपटाला हिट होण्यापासून रोखू शकत नाही. कारण लोक नेहमीच चांगले चित्रपट पाहतात.'
मिलिंद पुढे म्हणाला, 'जेव्हा एखादी चांगली कथा असते तेव्हा प्रेक्षक ती कथा पाहतात. तुम्ही अरे, हा एक अप्रतिम चित्रपट आहे, पण मी तो पाहणार नाही कारण मला अभिनेता आवडत नाही', असं बोलणार नाही. मला असं वाटतं की प्रेक्षक हे तीन प्रकारचे असतात, काहींना चित्रपट आवडतो तर काही लोक ज्यांना चित्रपट आवडत नाही, काही ट्रोल्स जे कधीच चित्रपट पाहत नाही.
आणखी वाचा : 'तू तर खूप मोठ्या मोठ्या बाता मारल्यास, पण...', कियारा अडवाणीची सिद्धार्थ मल्होत्रासाठीची Cryptic Post चर्चेत
मला असं वाटतं की आपण कोणाला किती महत्त्व देऊ शकतो? 'लाल सिंह चड्ढा' असू द्या किंवा मग रक्षाबंधन राहू द्या, कोणता ही चित्रपट असू द्या ज्याची कथा चांगली असेल तो चित्रपट प्रेक्षक नक्कीच वाचणार आहेत.