अक्षयनंतर आता मिलिंद सोमण साकारणार थर्ड जेंडरची भूमिका
आता होणार नव्या लूकची चर्चा
मुंबई : मिलिंद सोमण गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. आता चर्चेत येण्याचं कारण म्हणजे त्याने शेअर केलेला फोटो. या फोटोतून मिलिंद सोमण अक्षय कुमारच्या पावलावर पाऊल ठेवत असल्याचं दिसतंय. मिलिंद सोमणने शेअर केलेल्या फोटोत तो थर्ड जेंडरची भूमिका साकारताना दिसत आहे.
अक्षयचा नुकताच रिलीज झालेला 'लक्ष्मी' सिनेमा चर्चेत असताना मिलिंदचा हा लूक समोर आला आहे. मिलिंदने ट्विट करून याची माहिती दिली आहे. मिलिंद सोमण या प्रोजेक्टबद्दल अतिशय उत्साही असल्याचं दिसत आहे.
मिलिंद सोमणने आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय. मुंबई नजीकच्या कर्जतमध्ये काही दिवस घालवल्यानंतर आता चेन्नईत जायला तयार आहे. मला माहित आहे आता होळी नाही. पण तुम्हाला ते साकारायला मिळत असेल तेव्हा तुम्ही वेळेला आणि जागेला प्रश्न विचारू शकत नाही.