मुंबई : अमेझॉन प्राईम व्हिडीओ आज प्रेक्षकांची आवडती आणि बहुप्रतिक्षित ओरिजिनल सिरीज मिर्झापूर ही २३  ऑक्टोबर २०२० ला प्रदर्शित होणार आहे. याचे निर्मिती आणि निर्माते एक्सेल मीडिया अँड एंटरटेनमेंट असून  ही अमेझॉनची ओरिजिनल सिरीज आहे. या सिझनमध्ये १० पट जास्त ऍक्शन पॅक भरलेले असून या वेळेस प्रेक्षकांना हा सत्ता, सूड आणि शक्तीचा एक अनोखा चेहरा बघायला मिळणार आहे. या सिरीजमध्ये मिर्झापूरवासियांचे नवीन आणि आणखी खिळवणारे रूप प्रेक्षकांना बघायला  मिळणार आहे. नवीन पटकथा प्रेक्षकांना बंदुकीच्या, ड्रग्सच्या आणि एकंदरीतच काळ्या आणि बदनाम दुनियेच्या आणखी जवळ घेऊन जाणारी आहे ज्यात प्रेक्षकांना रोमान्स आणि ड्रामा सुद्धा अनुभवायला मिळेल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिर्झापूर २ च्या या नव्या कोऱ्या सिरीस मध्ये पंकज त्रिपाठी, अली फाझल, दिव्येंदु, श्वेता त्रिपाठी शर्मा, रसिक दुगल, हर्षित शेखर गौर, अमित सैल, अंजुम शर्मा, शिबा चड्ढा, राजेश तेलंग, मनू ऋषी चड्ढा दिसून येतील तर या काही सोबत नवीन चेहरे विजय वर्मा, प्रियांशु पेंयुली आणि इशा तलवार सुद्धा झळकतील. या नवीन चेहऱ्यांसोबत प्रेक्षकांना सिरीसच्या पटकथेमध्ये काही रंजक गोष्टी बघायला मिळतील. 


अमेझॉन ही आपली निर्मिती प्राईम इंडियाच्या सदस्यांना भारतात आणि भारताबाहेर २०० देशांमध्ये आणि क्षेत्रामंध्ये बघता येईल आणि सोबतच त्यांना कौन लेगा मिर्झापूर ?' या प्रश्नाचे उत्तर मिळेल २३ ऑक्टोबर २०२० ला नक्की मिळेल. 


याप्रसंगी बोलताना अपर्णा पुरोहित,  ओरिजिनल्सच्या मुख्य अधिकारी म्हणाल्या कि. "आम्ही प्रेक्षकांची आवड निवड लक्षात ठेऊनच आपली निर्मिती करत असतो.  मिर्झापूर सिरीस आमच्यासाठी खूप महत्वाची ठरली आहे. भारतीय प्रेक्षत कांना एका नव्या शैलीतील कथा आम्ही सांगू शकलो. आणि आमचे प्रयत्न योग्य दिशेने चालले आहेत याचा आम्हाला आनंद आहे."याविषयी आणखी बोलताना त्या म्हणाल्या कि, "मिर्झापूर मागील दोन वर्षात जो प्रेक्षकवृंद बांधला आहे तो बघून आम्ही चकित झालेलो आहोत.  प्रेक्षकांना एका नव्या शैलीतील कथा आम्ही सांगू शकलो. आणि तसेच यातील पात्र सदर जीवनशैलीत प्रचंड प्रसिद्ध झालीत. आमचे एक्सेल मीडियासोबतचे संबंध अत्यंत चांगले राहिलेले आहेत. त्यांच्या सोबत आम्ही आणखी एका उत्तम कथेची निर्मिती करू शकलो याचा आम्हाला आनंदच आहे. आम्हाला खात्री आहे कि याचा दुसरा सिझन सुद्धा प्रेक्षकांना तितकाच खिळवून ठेवेल आणि लोकांना ही सिरीजसुद्धा तितकीच आवडेल."


"मागच्या दोन वर्षांपासून मला फोनवर सतत विचारणा होत असते कि मिर्झापूर २ कधी बनणार आहे. आणि आम्हाला अत्यंत आनंद होत आहे कि आम्ही आता प्रेक्षकांच्या भेटीला नवीन सिझन घेऊन येत आहोत."  याप्रसंगी रितेश साधवानी, एक्सेल एंटरटेनमेंटचे निर्माते आपले मत व्यक्त केले. पुढे ते म्हणाले कि, "आम्ही नेहमीच एका उत्तम निर्मितीच्या प्रयत्नांत असतो. जी तांत्रिकरीत्या सुद्धा उत्तम असेल याचा आम्ही पूर्णपणे प्रयत्न करतो. आणि हेच लक्षात ठेऊन आम्ही मिर्झापूरची निर्मिती केलेली आहे. अमेझॉन सोबतचे आमचे मागील काही वर्षांचे बंध खूपच चांगले राहिले आहेत आणि आम्ही सोबत एवढा मोठा टप्पा गाठू शकलो याचा आम्हाला आनंद आहे." 


"आम्हाला स्वतःची क्षमता तपासून बघायची असल्याने आम्ही आमच्या परीने एक उत्तम निर्मिती देण्याचा प्रयत्न केला. आणि आमच्या प्रयत्नांना जागतिकरित्या मिळणार प्रतिसाद बघून आम्ही भारावून गेलेलो आहोत" या प्रसंगी निर्मितीकार पुनीत कृष्णा म्हणाले, पुढे ते म्हणाले कि, "पहिल्या सिझनला मिळणारा उदंड प्रतिसाद बघून प्रेक्षकांच्या आणि आमच्या स्वतःच्या स्वतःकडून उत्तम निर्मितीच्या अपेक्षा अधिकच वाढल्या आहेत. या नवीन पटकथेमध्ये असणारे नवीन पात्र प्रेक्षकांना अधिक रंजक आणि उत्तम वाटतील" 


या सिरीसचे निर्माते एक्सेल मीडिया अँड इंटरटनमेंट असून याची निर्मिती पुनीत कृष्णा आणि निर्देशक गुरमीत सिंग आणि मिहीर देसाई आहे 



 


मिर्झापूर ही सिरीज शक्ती, राजकारण आणि सूड याची कथा आहे. ही त्या लोकांची कथा आहे जे एकमेकांच्या वाटेत येतात आणि रागात ते बंदुकीचा वापर करण्यात अजिबात मागे पुढे बघत नाही. या सिझनमध्ये  नुसताच दंगा नसून राजकारण आणि गुन्हेगारी याचा सुद्धा समावेश या पटकथेमध्ये आहे. मिर्झापूर मिळविण्यासाठी घराणेशाही, राजकारण याचा वापर करून सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न या सिरीसमध्ये दाखविण्यात आलेला आहे. यात महिलांची भूमिका अधिक उत्तम दाखविण्यात आलेली आहे. या सिझनमध्ये शेवटी कोण जिंकणार ? त्रिपाठीसोबत कोण नडणार? पडदा मोठा असला तरी नियम मात्र एकच! येथे रक्ताची उधळण नक्की होणार!