`मिर्झापूर`च्या प्रसिद्ध अभिनेत्याचा अचानक मृत्यू, चाहत्यांना बसतोय मोठा धक्का!
देशातील लोकप्रिय वेब सिरीजपैकी एक असलेल्या `मिर्झापूर`च्या प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन झालं आहे.
मुंबई : देशातील लोकप्रिय वेब सिरीजपैकी एक असलेल्या 'मिर्झापूर'च्या प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन झालं आहे. ही बातमी ऐकून चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. सहकारी कलाकाराने त्याच्या इंस्टाग्रामवर अभिनेत्याच्या मृत्यूची माहिती दिली. मात्र, मृत्यूचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
दिवेंदू यांनी दिली माहिती
मिर्झापूर या वेबसिरीजमध्ये मुन्ना भैय्याचा जवळचा मित्र ललितची भूमिका साकारणाऱ्या ब्रह्मा मिश्रा यांचं निधन झालं आहे. खुद्द त्याचा सहकारी कलाकार दिव्येंदू शर्माने सोशल मीडियावर ही माहिती दिली आहे. ही दु:खद बातमी समजल्यानंतर ब्रम्हा मिश्रा उर्फ ललितच्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. रिपोस्ट लिहिताना अचानक दिव्येंदूने ब्रम्हा मिश्राचा स्वतःसोबतचा एक फोटो शेअर केला आहे आणि 'ललित आता आपल्यात नाही' अशा आशयाचं कॅप्शन दिलं आहे.
मिर्झापूरमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली
दिवेंदू शर्मा यांनी सगळ्यात आधी ब्रह्म मिश्रा यांच्या मृत्यूची बातमी त्यांच्या इंस्टाग्रामवर शेअर केली पण ब्रह्म मिश्रा यांचा मृत्यू कसा झाला हे सांगितले नाही. ब्रम्हा मिश्राने 'मिर्झापूर' वेब शोमध्ये ललित नावाच्या मुलाची भूमिका साकारली होती. जो कालीन भैय्याचा मुलगा मुन्ना भैय्याचा जवळचा मित्र होता. मिर्झापूरच्या दुसऱ्या सीझनमध्ये ललितच्या नावाने अनेक मीम्सही बनवण्यात आले होते.