मुंबई : 'प्यार का पंचनामा', 'टॉयलेट एक प्रेम कथा' अशा अनेक सिनेमांमधून प्रेक्षकांच्या भेटीस आलेला अभिनेता दिव्येंदु शर्माला 'मिर्झापूर' वेब सीरिजतून प्रचंड लोकप्रियता मिळाली. 'मिर्झापूर'मध्ये दिव्येंदुने मुन्ना भैय्याची भूमिका साकारली होती. आता लवकरचं मिर्झापूर सीरिजचा तिसरा भाग लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. पण सध्या चर्चेत आहे, मुन्ना भैय्या म्हणेजे दिव्येंदुची पत्नी. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिव्येंदुच्या पत्नी अभिनेत्री नसली तरी, बॉलिवूडच्या अभिनेत्री देखील तिच्या सौंदर्यापूढे फेल आहे. दिव्येंदुच्या पत्नीचं नाव आकांक्षा शर्मा आहे. दिव्येंदू शर्माने 2011 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर लगेचंच कॉलेज मैत्रिण आकांक्षासोबत लग्न केले.



दिव्येंदु आणि आकांक्षा लग्नाआधी बराच एकमेकांना डेट करत होते. दिव्येंदू अनेकदा पत्नी आकांक्षासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये आकांक्षाच्या वाढदिवशी दिव्येंदूने अनेक फोटो पोस्ट केले होते. पाहा फोटो


कोण आहे आकांक्षा शर्मा?
एका मुलाखतीदरम्यान दिव्येंदूने सांगितलं, 'आकांक्षा माझी कॉलेज फ्रेंड होती, आमच्या मैत्रीचं काही दिवसांनी प्रेमात रुपांतर झालं.' आकांक्षा व्यवसायाने ज्वेलरी डिझायनर आहे.