Miss India 2022 Sini Shetty Viral Video: 21 वर्षीय सिनी शेट्टी हीने मिस इंडिया 2022 हा किताब आपल्या नावावर केला आहे. या स्पर्धेत 31 सौंदर्यवतींनी भाग घेतला होता. या स्पर्धकांना मागे टाकत मिस इंडिया 2022 पुरस्कार पटकावला आहे. यानंतर सिनी शेट्टीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. फेमिना मिस इंडिया सिनी शेट्टीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यातील अनेक व्हिडीओ हे तिच्या डान्सचे आहेत. सिनी शेट्टीचा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये ती स्टेजवर डान्स करताना दिसत आहे. सिनीचा हा व्हिडीओ पाहून लोक वेगवेगळ्या कमेंट्स करत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सिनीचा व्हिडीओ व्हायरल


सिनी शेट्टीचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये ती पांढऱ्या रंगाच्या लहेंगामध्ये डान्स करताना दिसत आहे. हा हा व्हिडीओ बराच जुना असल्याचे दिसून येत आहे. या व्हिडीओमध्ये सिनी अतिशय सुंदर डान्स करताना दिसत आहे. पण हा व्हिडीओ पाहिल्यानंतर काही लोकांनी अश्लील कमेंट्स करायला सुरुवात केली आहे. एकाने लिहिले की, "ती सामान्य मुलीसारखी दिसते. त्यांच्यात आश्चर्यकारक काहीही नाही." दुसऱ्या युजर्सने लिहिलं आहे की, "सिनीमध्ये दिशा पटनीची झलकही पाहायला मिळाली."


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


 सिनी शेट्टी कर्नाटकची रहिवासी आहे. सिनी शेट्टीने तिचे सुरुवातीचे शिक्षण मुंबईतील सेंट डॉमिनिक सॅव्हियो स्कूलमध्ये घेतले. त्यानंतर तिने विद्या विहारच्या एसके सोमय्या डिग्री कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्समधून पदवी प्राप्त केली. तिने अकाऊंट्स आणि फायनान्समध्ये पदवी घेतली आहे. सध्या चार्टर्ड फायनान्शियल अॅनालिस्टचा कोर्स करत आहे.