उर्वशी रौतेलानं मिस युनिव्हर्स जज करण्यासाठी स्विकारलं इतकं मानधन
मिस युनिव्हर्स हरनाज सिंधूसोबत उर्वशी रौतेलाचेही कौतुक होत आहे.
मुंबई : अभिनेत्री आणि मॉडल उर्वशी रौतेला सोशल मीडियावरती फारच सक्रिय असते. ती तिच्या चाहत्यांसाठी नेहमीच सोशल मीडियावर फोटो किंवा व्हिडीओ शेअर करत असते. तिच्या फोटोंनी आणि तिच्या अदांनी तिने अनेक लोकांना घायाळ केलं आहे. उर्वशी रौतेलाने तिच्या मोहक आणि आकर्षक लूकने आधीच बॉलिवूडमध्ये स्वत: साठी एक स्थान निर्माण केले आहे, ती जेव्हाही बोल्ड भूमिका देते तेव्हा ती नेहमीच चर्चेत असते. नुकतंच उर्वशी रौतेलाची निवड मिस युनिव्हर्स जज म्हणून करण्यात आली. मिस युनिव्हर्सच्या इतिहासातील सर्वात तरुण जज म्हणून तिची निवड झाली.
उर्वशीच्या या कारकिर्दीने भारताची मान जगभरात उंचावली आहे. ज्यामुळे तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. उर्वशी रौतेला अवघ्या 27 वर्षांची आहे आणि तिने इतक्या कमी वयात मिस युनिव्हर्स (Miss Universe) कॉन्टेस्टला जज करुन एक मोठा इतिहास रचला आहे. ज्यामुळे तिच्याबद्दल लोकांच्या मनात आणखी आदर वाढला आहे आणि लोकं तिची प्रसंशा करण्यापासून स्वत:ला रोखू शकत नाहीत.
ऐवढेच काय तर, उर्वशीने जज केलेल्या या मिस युनिव्हर्स कॉन्टेस्टंटची विजेता ही भारतीय ठरली. ज्यामुळे या दोन्ही तरुणींनी भारताचा अभिमान आणखी वाढवला. तब्बल 21 वर्षांनी भारताकडे हा खिताब आला.
हरनाज संधूच्या आधी लारा दत्ता आणि सुष्मिता सेन यांनी हा खिताब पटकावला होता. नुकतीच हरनाज इस्रायलहून मुंबईत परतली, तिथे तिचे भव्य स्वागत करण्यात आले.
मिस युनिव्हर्स हरनाज सिंधूसोबत उर्वशी रौतेलाचेही कौतुक होत आहे, कारण भारताच्या या कन्येने इतक्या मोठ्या स्पर्धेला जज केलं आहे. परंतु तुम्हाला हे माहित आहे का? की यासाठी तिला किती मानधन दिलं गेलं आहे? ही किंमत ऐकूण तुम्हाला धक्का बसेल.
मिस युनिव्हर्स स्पर्धेला जज करण्यासाठी उर्वशी रौतेला आयोजकांकडून 1.2 दशलक्ष डॉलर्स मिळाले, भारतीय रुपयांमध्ये बोलायचे झाले तर, ही रक्कम सुमारे 8 कोटी रुपये.
उर्वशी रौतेला एका मोठ्या बजेटच्या तमिळ चित्रपटातून पदार्पण करणार आहे. ज्यामध्ये ती मायक्रोबायोलॉजिस्ट आणि आयआयटीयनची भूमिका साकारणार आहे. सुपर कॉप अविनाश मिश्राच्या सत्यकथेवर आधारित बायोपिक "इन्स्पेक्टर अविनाश" या वेब सीरिजमध्ये उर्वशी रणदीप हुड्डासोबत काम करत आहे.