मुंबई : मिस वर्ल्‍डचा किताब जिंकल्यानंतर मानुषी छिल्लर बॉलिवूडमध्ये पर्दापण करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. मात्र मानुषीचा तसा काही विचार नसल्याचे तिने यापूर्वीच स्पष्ट केले होते. सध्या ती तिच्या डॉक्टरीच्या अभ्यासाकडे लक्ष देत आहे. पण लवकरच मानुषी रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. सिनेमातून नाही तर जाहिरातीतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 


मानुषी करीनासोबत झळकणार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिस वर्ल्‍ड झाल्यानंतर मानुषीची ही पहिली जाहिरात आहे. मानुषीने ज्वेलरी निर्माता समूह मालाबार गोल्ड अॅण्ड डायमंड सोबत करार केला आहे. या ज्वेलरी ब्रॅंडच्या जाहिरातीत मानुषी करीना कपूरसोबत दिसेल. 



त्याबद्दल ती म्हणते की...


मानुषी म्हणाली की, भारतीय असल्याचा मला अभिमान आहे. सर्व सण आणि विशेषकरुन भावनांचा उत्सव करणारा हा देश आहे. मी मिस वर्ल्डपर्यंत हे सर्व सोबत घेऊन गेले होते. मालाबार गोल्ड सोबत जोडणे आनंददायी आहे. हे असे नाते आहे जे माझ्या हृदयाच्या अगदी जवळ आहे आणि प्रत्येक भारतीयासाठी खास आहे.


काय म्हणाले मालाबारचे अध्यक्ष?


मानुषी या ब्रॅंडशी जोडली गेल्याने मालाबार समूहाचे अध्यक्षांनी सांगितले की, मिस वर्ल्ड स्पर्धेच्या वेळेसच तिच्या बुद्धीमत्तेची जाणीव सर्वांना झाली. तेव्हा तिने सांगितले की मातृत्व सेवेला जगात सर्वात अधिक वेतन मिळायला हवे. याशिवाय ती खूप प्रेमळ असून सामाजिक कार्यात सहभागी होते. म्हणूनच मानुषी आणि मालाबार मिळून लोकांचे आयुष्य अधिक सुंदर बनवण्याचा प्रयत्न करत आहेत.