फोटोज : मानुषी छिल्लरने बनवले सॅनिटरी पॅट्स...
देशाला तब्बल १६ वर्षांनंतर मिस वर्ल्डचा किताब जिंकून देणारी मानुषी छिल्लर सध्या साऊथ आफ्रिकेत आहे.
मुंबई : देशाला तब्बल १६ वर्षांनंतर मिस वर्ल्डचा किताब जिंकून देणारी मानुषी छिल्लर सध्या साऊथ आफ्रिकेत आहे. तिथे एका महत्त्वपूर्ण कामासाठी मानुषी गेली आहे. एका सामाजिक कार्यात हातभार लावल्यासाठी मानुषी तिथे पोहचली आहे. तिथे काम करताना मानुषीची स्टाईल अतिशय ग्रेसफुल आहे.
साऊथ आफ्रिकेत सध्या नोबेल पुरस्कार विजेता आणि माजी राष्ट्रपती नेल्सन मंडेला यांचा वाढदिवस साजरा केला जात आहे. तिथे मानुषीने मासिक पाळीबद्दल जागृकता निर्माण केली. मानुषीने येथे सॅनटरी पॅड्स बनवणारी मशिनचे उद्घाटन केले. त्याचे काही फोटोज तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
मानुषीने तिथे काही पॅड्सही बनवले. या मशीनद्वारे दिवसाला सुमारे २ हजार पॅड्स तयार केले जातात. येथे रोज शिफ्टमध्ये ७-८ महिला काम करतील. या खास प्रसंगी साऊथ आफ्रिकेचे राष्ट्रपती सिरील रामापोसा देखील मानुषीसोबत उपस्थित होते.
एक फोटो शेअर करत मानुषीने लिहिले की, नेल्सन मंडेला यांचा विश्वास होता की, प्रत्येक व्यक्तीकडे शिक्षण आणि स्वास्थ्याचा अधिकार आहे. यावर विश्वास ठेवतच आम्ही २०० हून अधिक ब्लॅंकेट आणि गरम टोप्यांचे गावात वाटप केले. त्याचबरोबर १०० मुलांना सायकलींचेही वाटप केले.
हरियाणातील झज्जर येथे राहणारी मिस वर्ल्ड मानुषीचा येथे खास अंदाजात दिसली. मिनी ड्रेसमध्ये ती अत्यंत सुंदर दिसत होती. ड्रेस डिझाईनर लेबल पापा डोन्ट प्रीचने हा ड्रेस डिझाईन केला आहे.