मुंबई : अक्षय कुमारचा 'मिशन मंगल' चित्रपट चार आठवड्यांनंतरही बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करताना दिसतोय. 'मिशन मंगल'ने भारतात २००.१६ कोटींचा गल्ला जमवला आहे. यासोबतच २०० कोटी क्लबमध्ये एन्ट्री करणारा 'मिशन मंगल' अक्षय कुमारचा पहिलाच चित्रपट ठरला आहे. 'मिशन मंगल'च्या जबरदस्त कमाईनंतर पुन्हा एकदा अक्षय कुमार बॉक्स ऑफिसचा 'खिलाडी' ठरलाय असं म्हणणं वावगं ठरणार नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली. 




'मिशन मंगल' १५ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. १५ ऑगस्ट या स्वातंत्र्यदिनी सर्वाधिक कमाई करण्याचा रेकॉर्ड सलमानच्या 'एक था टायगर' चित्रपटाच्या नावे होता. सलमान-कतरिनाच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १९८.७८ कोटींची कमाई केली होती. पण 'मिशन मंगल'ने सलमानच्या चित्रपटाचा रेकॉर्ड मोडत २०० कोटींचा गल्ला पार केला आहे. 




'मिशन मंगल' चित्रपटाचं दिग्दर्शन जगन शक्ति यांनी केलंय. अक्षय कुमारसह चित्रपटात विद्या बालन, तापसी पन्नू, शर्मन जोशी, सोनाक्षी सिन्हा, कीर्ति कुल्हारी, नित्या मेनन, संजय कपूर आणि जीशान अयूब यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे.


चित्रपटात अक्षय, संशोधक राकेश धवन या मिशनच्या प्रमुखाची भूमिका साकारत आहे. इतिहासच्या पानांत सुवर्णाक्षरात नोंद झालेल्या देशाचा प्रेरणादायी अंतराळ प्रवास या चित्रपटात दाखवण्यात आला आहे.