मुंबई : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांना रुग्णालयात दाखल केल्याची बातमी चाहत्यांना हादरवून गेली. या पाठोपाठ आता आणखी एका दिग्गज अभिनेत्याला रुग्णालयात दाखल केल्याची बातमी समोर येत आहे. खरंतर, सध्या एक फोटो व्हायरल होत आहे. ज्यामध्ये मिथुन चक्रवर्ती हॉस्पिटलच्या बेडवर झोपलेले दिसत आहेत. हा फोटो समोर आल्यानंतर चाहते मिथुन यांना उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा देत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिथुन यांचा फोटो व्हायरल 
बॉलिवूडचे सुप्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र रुग्णालयात दाखल असल्याची धक्कादायक बातमी समोर आली होती. पण नंतर समजलं की, धर्मेंद्र यांना रुटीन चेकअपसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. धर्मेंद्र यांची प्रकृती ठीक असून ते त्यांच्या घरी परतले आहेत. पण आज बॉलिवूड इंडस्ट्रीतून आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.


काही दिवसांपासून बॉलीवूड अभिनेता मिथुन चक्रवर्तीचा एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे ज्यामध्ये तो हॉस्पिटलमध्ये दिसत आहे. हा फोटो पाहिल्यानंतर मिथुन चक्रवर्तीचे चाहते त्यांच्या दीर्घायुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा देत आहेत.


सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये मिथुन चक्रवर्ती बेडवर बेशुद्ध अवस्थेत दिसत आहे. मिथुन चक्रवर्ती यांच्या व्हायरल फोटोमुळे त्यांच्या प्रकृतीशी संबंधित अनेक अफवाही उडू लागल्या होत्या. ज्याला पूर्णविराम देत त्यांचा मुलगा मिमोह चक्रवर्तीने त्यांच्याबद्दल माहिती दिली आहे. अभिनेत्याच्या मुलानं सांगितलं की, मिथुन चक्रवर्ती यांना किडनी स्टोनच्या समस्येमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. 


वडिलांच्या प्रकृतीबाबत माहिती देत त्यांच्या मुलाने सांगितलं की, किडनीमध्ये स्टोन असल्यामुळे त्यांना बंगळुरू येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. फोटोमध्ये ते बेशुद्ध अवस्थेत दिसत आहेत. आता ते पूर्णपणे बरे असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या मिथून चक्रवर्ती घरी आराम करत आहेत. दरम्यान, भाजप नेते मिथुन चक्रवर्ती यांचा हा फोटो शेअर करत त्यांना लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.




भाजपचे राष्ट्रीय सचिव डॉ अनुपम हाजरा यांनी मिथुन चक्रवर्ती यांचा हा फोटो शेअर केला आणि त्यांना लवकरात लवकर बरं होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. याचबरोबर भाजप नेते संजय सिंह यांनीही त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर हाच फोटो शेअर केला आहे.