मुंबई : आपल्या गाण्यावर सगळ्यांनाच थिरकायला लावणारे गायक बप्पी लहरी यांचं १७ फेब्रुवारी रोजी निधन झालं. बप्पी दा यांच्या अचानक जाण्याने सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसला आहे. बॉलिवूड सिनेसृष्टीला बप्पी दा यांनी खूप गाणी दिली. त्यामुळे त्यांचं निधन हा खूप मोठा धक्का आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

असं असताना अभिनेता मिथुन चक्रवर्ती हे बप्पी दा यांच्या अंत्यसंस्काराकरता पोहोचले नाही. मिथुन दा यांचं न येणं प्रत्येकासाठी आश्चर्यचकीत करणारं होतं. यावर पहिल्यांदाच मिथुन चक्रवर्ती यांनी त्यांच्या न येण्याचं कारण सांगितलं आहे. 


बॉलिवूड ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना 'डान्सिंग स्टार' म्हणून ओळखलं जातं. 


 'आय एम अ डिस्को डान्सर', 'जिम्मी जिमी जिमी आजा', 'याद आ रहा है', 'कम क्लोजर' सारख्या गाण्यांनी मिथुन चक्रवर्ती यांचं पूर्ण करिअरच बदललं. 


ही सगळी गाणी मिथुन दा यांच्यासाठी बप्पी लहरी यांनी दिली आहे. या गाण्यांमुळे मिथुन दा यांचं करिअर पूर्णपणे बदललं. 



असं असूनही बप्पी लहरी यांच्या अंत्यविधीला गेले नाहीत. यामुळे चाहत्यांना खूप मोठा धक्का बसला. 


मिथुन चक्रवर्ती यांनी पहिल्यांदाच बप्पी दा यांच्या अंत्यविधीला न जाण्याचं कारण सांगितलं आहे. 


जेव्हा बप्पी लहरी यांचे निधन झाले, तेव्हा चाहत्यांनी सोशल मीडियावर बप्पी दा यांच्या गाण्यांनी भरभरून आदरांजली वाहिली. 


80 च्या दशकात संगीत म्हणजे बप्पी दा आणि मिथुन दा यांची गाणी सोशल मीडियावर ट्रेंड होत होती.


मिथुन चक्रवर्ती म्हणाले की, बप्पी दा यांनी अखेरचा श्वास घेतला तेव्हा ते बंगळुरूमध्ये होते. बप्पा दा यांच्या जाण्याने त्यांना एवढा मोठा धक्का बसला की त्यांना खूप दुःख झालं.  परंतु त्यांना बप्पी दा यांची अखेरची आठवण अशी नको होती. त्यामुळे ते अंत्यसंस्काराला गेले नाहीत.