Mithun Chakraborty Dadasaheb Phalke Award : बॉलिवूडचे जेष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे. याविषयी केंद्रीय रेल्वे, माहिती आणि प्रसारण, इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याविषयी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. मिथुन चक्रवर्ती यांच्या चाहत्यांना ही बातमी मिळाल्यानंतर त्यांनी देखील आनंद व्यक्त केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अश्विनी वैष्णव यांनी आधीच्या ट्विटर अर्थात आताच्या X अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. त्यानी या ट्वीटमध्ये सांगितलं की कोलकाताच्या रस्त्यांवरून चित्रपटसृष्टीत स्वत: चं स्थान मिळवत इतकं यश मिळवलं. मिथुन दा यांनी चित्रपटसृष्टीतील उल्लेखनीय कामगिरी करत येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा दिली आहे. त्यामुळे दादासाहेब फाळके हा पुरस्काराच्या ज्युरीनं दिग्ग्ज अभिनेता श्री. मिथुन चक्रवर्तीजी यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील त्यांच्या अतुलनीय योगदानासाठी हा पुरस्कार जाहिर करण्यात आला आहे. 



त्याशिवाय अश्विनी यांनी हा खुलासा देखील केला की मिथून चक्रवर्ती यांना हा पुरस्कार 70 वा नॅशनल फिल्म अवॉर्ड कार्यक्रमात अर्थात 8 ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे. 


मिथुन चक्रवर्ती यांना पहिल्याच चित्रपटासाठी मिळाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार


मिथुन चक्रवर्ती यांच्या कामाविषयी बोलायचं झालं तर त्यांचा चित्रपटसृष्टीतील प्रवास हा सगळ्यांसाठीच प्रेरणादायी आहे. त्यांनी करियरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट करत प्रेक्षकांचे मनोरंजन केले. कोलकानामध्ये मिथुन यांचा जन्म झाला होता. मिथुन हे अभिनेता, निर्माता आणि राजकारणी आहेत. त्यांनी आजवर 350 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलं. त्यांनी हिंदी, बंगाली, तमिळ, भोजपुरी, तेलगू, कन्नड आणि पंजाबी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 1977 मध्ये प्रदर्शित झालेल्या Mrigayaa या चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. मिथून यांना त्यांच्या पहिल्याच चित्रपटासाठी सर्वोतकृष्ट अभिनेत्याचा नॅशनल अवॉर्ड मिळाला होता.