मुंबई : बॉलिवूड अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांचा मुलगा मिमोह म्हणजे महाअक्षय चक्रवर्ती पुढच्या महिन्यात विवाह बंधनात अडकणार आहे. मिमोहचा विवाह अभिनेत्री शीला शर्मा यांच्या मुलीशी होणार आहे. मदालसा शर्मा असं तिचं नाव आहे. शीला शर्मा यांनी नदिया के पार आणि हम साथ-साथ है अशा सिनेमांमध्ये काम केलं आहे. शीला शर्मा यांनी लेखक सुभाष शर्मा यांच्यासोबत विवाह केल्यानंतर मुंबईमध्ये प्रोडक्शन हाऊस सुरु केलं होतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शीला शर्मा यांची मुलगी मदालसा ही देखील अभिनेत्री आहे. तिने तमिळ आणि तेलुगू सिनेमांमध्ये काम केलं आहे. 2011 मध्ये मदालसाने गणेश आचार्य यांच्या एंजेल सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केलं होतं.



मदालसाचा जन्म 26 सप्टेंबर 1991 ला मुंबईत झाला आहे. मीठीबाई कॉलेजमध्ये तिने इंग्लिश लिटरेचरची डिग्री घेतली आहे. मदालसा अॅक्टिंग आणि डांस देखील शिकली आहे. 2009 मध्ये तेलुगू सिनेमामध्ये फिटिंग मास्टरमध्ये तिने डेब्यू केलं होतं. यानंतर तिने कन्नड सिनेमा शौर्यमध्ये काम केलं आहे. यानंतर तिने हिंदीमध्ये पदार्पण केलं.



मदालसाने एका इंटरव्यूमध्ये सांगितलं की, 7 जुलैला तिचा विवाह आहे आणि ती खूप उत्साहित आहे. ही एक डेस्टिनेशन वेडिंग आहे. विवाह मुंबईमध्ये होणार आहे.