COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवी दिल्ली : अभिनेता मिथुन चक्रवर्ती याची पत्नी योगिता बाली आणि मुलगा महाअक्षय उर्फ मिमोह चक्रवर्ती यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिल्लीच्या रोहिणी कोर्टानं दिलेत. योगिता आणि महाअक्षय यांच्यावर बलात्कार, फसवणूक आणि जबरदस्तीनं गर्भपाताचा आरोप करण्यात आलाय. परंतु, हा आरोप कुणी केलाय याबद्दल मात्र अद्याप गुप्तता पाळण्यात आलीय. 


उल्लेखनीय म्हणजे, गेल्या काही दिवसांपासून महाअक्षय बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक सुभाष शर्मा यांची मुलगी मदालसा शर्मा हिच्यासोबत विवाहासाठी चर्चेत आहे. मदालसाही एक अभिनेत्री आहे... 


मदालसा आणि महाअक्षय यांचा गेल्या महिन्यात 'रोका' (विवाहाअगोदरचा एक विधी) पार पडलाय. ७ जुलै रोजी दोघांचा विवाह आयोजित करण्यात आलाय. परंतु, या विवाहाच्या केवळ पाच दिवसांअगोदर महाअक्षय आणि त्याच्या आईवर हा गुन्हा दाखल करण्याचे आदेश कोर्टानं दिलेत. त्यामुळे, आता या आयोजित लग्न समारंभावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय.