मुंबई : बॉलिवूडचे दिग्गज कलाकार मिथुन चक्रवर्थी यांची सून मदालसा  शर्मा सध्या चांगलीचं चर्चेत आहे. कायम सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असणाऱ्या मदालसाने एक व्हिडियो इन्स्टागार्मवर पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये ती बाथरूममध्ये अनोख्या अंदाजात डान्स करताना दिसत आहे. तिचा हा डान्सिग व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. शिवाय चाहत्यांना देखील तिचा हटके अंदाज चांगलाचं भावला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बाथरूममधील डान्सचा व्हिडिओ  शेअर करत मदालसाने व्हिडिओला कॅप्शन देखील दिलं आहे. 'जेव्हा आपण स्वतःचा बाथरूम कॅन्सर्ट आयोजीत करतो...' असं कॅप्शन मदालसाने तिच्या व्हिडिओला दिला आहे. मदालसा सतत फोटो आणि व्हिडिओ शेअर करत चाहत्यांच्या  संपर्कात राहते. 



मदालसाने 'अनुपमा' मालिकेच्यामाध्यमातून चाहत्यांच्या मनात घर केलं आहे. मालिकेत ती खलनायकाची भुमिका पार पाडत आहे. तिच्या या भुमिकेचं नाव काव्या असं आहे. शिवाय मदालसाचा फॅशन सेंन्स देखील चाहत्यांना आवडतो. मदालसा स्वतःच्या फॅशन सेंन्समुळे देखील चर्चेत असते. 


मालिकेतच नाही तर रियल लाईफमध्ये देखील मदालसा अतिशय स्टायलिश आणि बोल्ड आहे. मदालसा शर्मा ही खूपच सुंदर आहे. या शोमध्ये मदालसा अतिशय स्टाईलिश दिसून आली आहे. मदालसा शर्माचा लूक सोशल मीडियावर चर्चेत आहे. अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांची सून असल्यानेही मदालसा ही चर्चेत असते.