मुंबई : बॉलिवूडमध्ये स्टार किड्सच्या बाबतीत एक शर्यत लागलेली आहे. आता बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्यांच्या मुलांची एन्ट्री होत आहे. यामध्ये मिथून चक्रवर्तीची मुलगी देखील आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बरेच कलाकारांचे मुलं बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्याची तयारी रकरत आहे. मिथुन चक्रवर्ती यांची कन्या दिशानी देखील आता बॉलिवूडमध्ये पर्दापण करणार आहे. तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर येत असतात.


सोशल मीडियावर सक्रिय



सोशल मीडियावरही दिशानी खूप सक्रिय आहे. मिथुनची मुलगी सुद्धा बॉलिवुडमध्ये येण्यासाठी सज्ज झाली आहे. अलीकडच्या काळात अशी चर्चा होती की ती बॉलिवूडमध्ये येणार पण कधी येणार याबाबत सगळ्यांच उत्सूकता होती.


सिनेमा सारखी आहे जीवनाची कथा


दिशानी ही मिथुन यांची खरी मुलगी नाही. मिथुन यांनी तिला दत्तक घेतली आहे. दिशानीच्या जीवनाची कथा कोणत्याही सिनेमापेक्षा कमी नाही आहे. दिशानीला कचऱ्याच्य़ा ढिगातून मिथुन यांनी घरी आणलं होतं असं म्हटलं जातं. मिथुन यांनी एका वर्तमानपत्रात बातमी वाचली होती की एक मुलगी कचऱ्याच्या ढिगात सापडली आहे. तिला कोणीच उचलायला तयार नव्हतं. तेव्हा मिथुन यांनी तिला आपल्या घरी आणले होते.


 


लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण



आता दिशानी मोठी झाली आहे. ती लवकरच बॉलिवूडमध्ये येणार आहे. दिशानी अतिशय आकर्षक आणि सुंदर आहे. तिच्या व्यतिरिक्त मिथुनला आणखी तीन मुले आहेत. दिशानी न्यूयॉर्कमधील फिल्म अकादमीमधून अभिनयाचा कोर्स करत आहे. ती चित्रपटांमध्ये स्वतःचं करियर बनवू इच्छिते. सध्या सगळेच दिशानीच्या बॉलिवूड पदार्पणाची वाट बघत आहे.