`फिल्मसिटीच मुंबईबाहेर हलवायचं कुटील कारस्थान रचलं जातंय`
सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडल मत
मुंबई : बॉलिवूड स्थलांतरी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याच म्हटलं जात आहे. यावर मनसे नेता अमेय खोपकर यांनी देखील आपलं मत व्यक्त केलं आहे. जाणीवपूर्वक बाॅलीवूडलाच बदनाम करण्याचा डाव रचला जातोय, एवढंच नाही तर फिल्मसिटीच मुंबईबाहेर हलवायचं कुटील कारस्थान रचलं जातंय, असा आरोप यावेळी अमेय खोपकर यांनी केला आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमातून हे मत मांडण्यात आलंय. 'भूतकाळातही बाॅलीवूडमधील कलाकारांना गंभीर गुन्ह्याखाली अटक झाली, त्यांना शिक्षा झाल्या, पण म्हणून कुणीही पूर्ण बाॅलीवूडलाच खलनायक ठरवलं नाही. आता मात्र जाणीवपूर्वक बाॅलीवूडलाच बदनाम करण्याचा डाव रचला जातोय, एवढंच नाही तर फिल्मसिटीच मुंबईबाहेर हलवायचं कुटील कारस्थान रचलं जातंय. महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही असली कारस्थानं कधीही यशस्वी होऊ देणार नाही. तंत्रज्ञांपासून कलाकारांपर्यंत कुणीही घाबरायची गरज नाही, कारण राजसाहेबांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना सदैव तुमच्या पाठीशी आहे आणि यापुढेही राहणार, हा आमचा शब्द आहे., असं म्हटलं आहे.
भूतकाळातही बाॅलीवूडमधील कलाकारांना गंभीर गुन्ह्याखाली अटक झाली, त्यांना शिक्षा झाल्या, पण म्हणून कुणीही पूर्ण...
Posted by Ameya Khopkar on Thursday, October 15, 2020
मुंबईतून बॉलिवूडला संपवण्याचे किंवा स्थलांतरीत करण्याचे प्रयत्न खपवून घेणार नसल्याचे विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.कोरोना पार्श्वभुमी आणि सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणानंतर बॉलिवूडवर मोठ्या प्रमाणात चिखलफेक करण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी नुकतीच मल्टीप्लेक्स आणि सिनेमा थिएटर मालकांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मिटींग घेतली. त्यावेळी ते बोलत होते. या पार्श्वभुमीवर ते बोलत होते. मुंबई ही केवळ भारताची आर्थिक राजधानीच नव्हे तर सांस्कृतिक राजधानी देखील आहे. बॉलिवूड आणि सिनेमामुळे असंख्य रोजगार निर्माण होत असल्याचेही ते म्हणाले. काहीजण बॉलिवूडला बदनाम करण्याचा प्रयत्न करतायत, हे खूपच चिंताजनक असल्याचे ते म्हणाले.