दिग्दर्शक ऋषभ शेट्टीचा (Rishab Shetty) 'कांतारा' (kantara) या चित्रपटाचं नाव सध्या सर्वांच्याच ओठावर आहे. कन्नडमध्ये चित्रपटाला मिळालेल्या प्रतिसादानंतर निर्मात्यांनी तो इतर भाषांमध्ये प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आणि त्याला जोरदार प्रतिसाद मिळाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हिंदीतील (Hindi) 'कांतारा' (kantara) हा चित्रपट 14 ऑक्टोबरला थिएटरमध्ये दाखल झाला. या चित्रपटानं सगळ्यांना वेड लावलं. 'कांतारा' चित्रपट हा चर्चेत असताना दिवाळीच्या मुहूर्तावर 25 ऑक्टोबरला अक्षय कुमार (Akshay Kumar) स्टारर राम सेतू (Ramsetu) आणि


अजय देवगण (Ajay Devgn) स्टारर थँक गॉड (Thank God) हे चित्रपट प्रदर्शित झाले. या चित्रपटांसोबत मराठी चित्रपट 'हर हर महादेव' (Har Har Mahadev) हा चित्रपट प्रदर्शित झाला. 'हर हर महादेव' या मराठमोळ्या चित्रपटानं 'राम सेतू' आणि 'थॅंक गॉड' या चित्रपटांना


कमाईच्या बाबतीत टक्कर दिली आहे. हरहर महादेव या चित्रपटानं देखील धमाकेदार कमाई केली आहे. 


'हर हर महादेव'नं पहिल्याच दिवशी 2.25 कोटींची कमाई केली. हा चित्रपट 400 चित्रपटगृहात प्रदर्शित झाला असून त्याचे 1200 शो झाले आहेत. आता विकेंड जवळ येत असल्याचे पाहता चित्रपटाच्या कमाईत चांगली वाढ होणार असल्याचे म्हटले जात आहे.


'हर हर महादेव' ही छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे एकेकाळचे सरसेनापती बाजी प्रभू देशपांडे यांची कथा आहे. चित्रपटात सुबोध भावेनं छत्रपती शिवाजी महाराजांची तर शरद केळकरने बाजी प्रभू देशपांडे यांची भूमिका साकारली आहे. 


चित्रपटाच्या सुरवातीला राज ठाकरे यांच्या आवाजाने चांगल्याची ऊर्जा आणली . आता  हे dubbing  किंवा voice over च काम कस पार पडलं याचा एक चिडीओ म्हणजेच मेकिंगचा व्हिडीओ (making video of har har mahadev raj thackrey) सोशल मीडियावर व्हायरल होतोय.