रणवीरला सिंगला सर्वात मोठा धक्का; चाहत्यांनाही काही सुचेना
असं होण्यामागचं कारणंही तसंच आहे.
मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये कलाकारांच्या सवयी, त्यांचा या जगतातील वावर या साऱ्यामुळंच त्यांना वेगळी ओळख मिळते. अभिनेता रणवीर सिंग यालाही अशाच काही कारणांमुळे वेगळी ओळख मिळाली होती. पण, आता मात्र रणवीरला एक जबर धक्का मिळू शकतो. (Ranveer singh)
असं होण्यामागचं कारणंही तसंच आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत रणवीरनं आतापर्यंत बहुविध भूमिकांसोबतच तितक्याच अतरंगी स्टाईल स्टेटमेंटनं सर्वांच्या मनावर राज्य केलं.
चौकटीबाहेरील स्टाईल म्हटलं, की रणवीरचाच चेहरा सर्वांसमोर येतो. पण, आता मात्र यासाठी एक दुसरा पर्यायही उपलब्ध होत असल्याचं दिसून येत आहे.
कारण ठरतोय एक मॉडेल, अभिनेता साहिल सलाथिया (Sahil Salathia).
साहिल हा त्याच्या अभिनयाशिवाय चकित करणाऱ्या फॅशन सेन्ससाठी ओळखला जात आहे. त्यानं आतापर्यंत अनेकदा पायघोळ स्कर्ट घालून काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
साहिलला त्याच्या लुकसोबत काहीतरी नवे प्रयोग करायला आवडत असल्यामुळे तो या रुपात दिसतो. सध्या साहिल रणवीर सिंगला स्टाईल, लूक आणि फॅशन सेन्सच्या बाबतीतल चांगलीच टक्कर देताना दिसत आहे. 'बिग बॉस' या रिअॅलिटी शोमध्ये सहभागी होण्याची संधी त्याला मिळाली होती. 'पानिपत' या चित्रपटातून त्यानं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानं या चित्रपटात शमशेर बहाद्दर ही भूमिका साकारली होती.
काहीही असो, पण सध्या मात्र साहिल आणि रणवीर यांच्यामध्ये जोरदार तुलना केली जात असून, फॉलोअर्स आणि चाहत्यांची पसंती नेमकी कोणाला मिळतेय हेच पाहणं महत्त्वाचं आहे.