Kim Sharma Breakup : `मोहब्बतें` फेम एक्ट्रेस किम शर्माचं ब्रेकअप, लिएंडर पेसला करत होती डेट
बऱ्याच दिवसांपासून टेनिस चॅम्पियन लिएंडर पेस अभिनेत्री किम शर्मा (Kim Sharma) ला डेट करत होता. पण नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार किम शर्मा आणि टेनिस चँम्पियन लिएंडर पेस यांच्या नात्यात दुरावा आला आहे.
Kim Sharma Leander Paes Breakup : टेनिस चॅम्पियन लिएंडर पेसची लव्ह लाईफ पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. बऱ्याच दिवसांपासून टेनिस चॅम्पियन लिएंडर पेस अभिनेत्री किम शर्मा (Kim Sharma) ला डेट करत होता. पण नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार किम शर्मा आणि टेनिस चँम्पियन लिएंडर पेस यांच्या नात्यात दुरावा आला आहे.
अशी बातमी आहे की, गेले अनेक दिवसांपासून त्यांच्यात काहीच ठिक सुरु नव्हतं. खरंतर या दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चा तेव्हा पासून सुरु झाल्या जेव्हा ती अनन्या पांडेच्या बहिणीच्या लग्नाला एकटी पोहचली होती. तेव्हापासून ब्रेकअपच्या बातम्यांनी जोर धरला होता. किम शर्माने 'मोहब्बतें' या चित्रपटातून करिअरला सुरुवात केली होती. किम शर्माची लव्ह लाईफ पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
दोघांच्या एनिव्हर्सरीनिमीत्त कोणीच सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली नाही आणि यानंतर या दोघांच्या ब्रेकअपच्या बातम्यांनी जोर धरला. टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, किम शर्मा (Kim Sharma) आणि लिएंडर पेस (Leander Paes)चा ब्रेकअप झाल्याचा दावा करण्यात आला आहे. दोघांमध्ये कमिटमेंट्स नव्हत्या. त्यामुळेच या दोघांमध्ये वाद व्हायचे. दोघंही आपल्या फ्यूचरमुळे हैराण झाले होते. या दोघांचं नातं चांगल्या नोटवर संपलं नाही.
किम शर्मा आणि लिएंडरचं नातं २०२१ मध्ये सुरु झालं. अनेकदा हे कपल कधी डिनरसाठी तर कधी जिम सेशन एकत्र स्पॉट व्हायचे. यानंतर हे कपल गोव्यामध्ये वेकेशनसाठी गेले होते. लिएंडरच्या वाढदिवसा निमीत्त हे कपल फिरायला गेलं होतं. आणि इथूनच त्यांच्या नात्याबद्दल बाहेर बोलू जाऊ लागलं.
5 सप्टेंबर 2021ला या दोघांनी आपलं नातं सार्वजनिक केलं. करिअरबद्दल बोलायचं झालं तर, तिचा मोहाबत्ते हा सिनेमा खूप गाजला. पण यानंतर ती तिच्या करिअरमध्ये काही खास करु शकली नाही. अभिनेत्री बऱ्याच सिनेमात झळकली मात्र तिची एक्टिंग कोणाला फारशी भावली नाही. याआधी अभिनेत्रीने युवराज सिंहला डेट केलं आहे. याचबरोबर स्पेनिश सिंगरसोबतही तिचं नाव जोडलं गेलं आहे.