इंटरनेटवर लीक झालेला `मोहल्ला अस्सी`चा ट्रेलर प्रदर्शित
`मंदिर यही बनाएंगे`च्या घोषणांनी निनादणार सिनेमागृह
मुंबई : अभिनेता सनी देओल आणि साक्षी तन्वर यांचा काही वर्षांपासून वादात अडकलेला 'मोहल्ला अस्सी' हा संपूर्ण सिनेमा याआधीच इंटरनेटवर लीक झालाय. परंतु, हा सिनेमा अधिकृतरित्या सिनेघरांत प्रदर्शित होऊ शकला नव्हता. गुरुवारी युट्युबवर काही तासांपूर्वी या सिनेमाचा ट्रेलर अधिकृतरित्या प्रदर्शित करण्यात आलाय. हा ट्रेलर सोशल मीडियावर ट्रेन्ड होतोय.
बनारसच्या 'मोहल्ला अस्सी'च्या गल्ल्या-गल्ल्या राम मंदिर बनवण्यासारख्या विषयांनी दणाणू उठतात. हाच विषय समोर आणणाऱ्या या सिनेमाला 'ए' सर्टिफिकेट देण्यात आलंय.
दीर्घकाळापासून हा सिनेमा मंजुरीसाठी सेन्सॉर बोर्डाच्या कात्रीत अडकला होता. सनी देओल, साक्षी तन्वर आणि रवि किशन यांच्या या सिनेमात प्रमूख भूमिका आहेत. हा सिनेमा येत्या १६ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होत आहे.
काशीनाथ सिंह यांच्या प्रसिद्ध 'काशी का अस्सी' या कादंबरीवर या सिनेमाचं कथानक बेतलंय. या सिनेमाचं शुटींग २०११ साली सुरू झालं होतं.
इंटरनेटवर काही सीन लीक झाल्यानंतर काही हिंदू संघटनांनी या सिनेमाचा विरोध केला होता.