Mona Singh With Shah Rukh Khan:  शाहरूख खान यानं आपला 58 वा वाढदिवस नुकताच साजरा केला आहे त्यामुळे त्याची जोरात चर्चा आहे. त्याच्या वाढदिवसाचे फोटोही सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. सध्या त्याचा आणि एका अभिनेत्रीचाही फोटो चर्चाचा विषय ठरला आहे. यावेळी तिचा शाहरूख खानसोबत एक फोटो व्हायरल झाला आहे. यावेळी त्याच्या वाढदिवसानिमित्त हा फोटो तिनं शेअर केला होता. मध्यंतरी तिनं एका मुलाखतीतून हा खुलासा केला होता की तिची 'जस्सी जैसी कोई नहीं' ही मालिका प्रचंड लोकप्रिय झाली होती. तेव्हा आर्यन आणि सुहाना हे तिची ही सिरियल आवर्जून पाहायचे. शुटिंगच्या अशाच एका दिवशी शाहरूख खान आपल्या लहान मुलांना कडेवर घेऊन आला होता. तेव्हा शाहरूख खाननं सांगितले की कशाप्रकारे त्याच्या मुलांना तिची ही सिरियल आवडते आणि ते टायटल सॉन्ग झाल्यापेक्षा अजिबातच जेवत नाहीत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आतापर्यंत ही अभिनेत्री कोण हे तुमच्या लक्षात आलंही असेल की आम्ही कुठल्या अभिनेत्रीबद्दल बोलत आहोत. या अभिनेत्रीचं नावं आहे मोना सिंग. मोना सिंग हिनं शाहरूख खानसोबतच एक फोटो शेअर केला आहे ज्याची सध्या चर्चा आहे. मोना सिंग ही लोकप्रिय अभिनेत्री आहे. सध्या ती मेड इन हेवनच्या सिझन 2 मध्ये दिसली होती. यातील तिच्या अभिनयाचे प्रेक्षकांकडून कौतुक करण्यात आले होते. यासाठी तिला पुरस्कारही प्राप्त झाला आहे. तिनं अनेक मालिकांमधून आणि चित्रपटांतून कामं केली आहे. 2022 साली आलेल्या 'लाल सिंग चड्ढा' या चित्रपटातून तिनं आमिर खानच्या आईची भुमिका केली होती. तिच्या या चित्रपटातील भुमिकेचेही प्रचंड कौतुक करण्यात आले होते. 


सध्या तिनं शाहरूख खानसोबतचा आपला एक फोटो पोस्ट केला आहे ज्यात तो तिला किस करताना दिसतो आहे. त्यामुळे या फोटोवर चाहत्यांच्याही नानाविध कमेंट्स येयला सुरूवात झाली आहे. यावेळी या फोटोवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.



यावेळी मोना सिंगनं कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, 'शाहरूख तु माझ्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहेस. मीही तूझ्यावर प्रेम करते बस. जन्मदिवसाच्या शुभेच्छा!'  'क्या हुआ तेरा वादा', 'इतना करो ना मुझे प्यार', 'प्यार को हो जाने दो', 'कवच...काली शक्तियों' अशा मालिकांमधून तसेच थ्री इडियट्समध्येही करिना कपूरच्या बहीणीची भुमिका केली होती. सोशल मीडियावरही ती खूप सक्रिय आहे. तिच्या फोटोंनाही प्रचंड लाईक्स येताना दिसतात.