भारताचे लोक प्राण्यांपेक्षाही वाईट-मोनाली ठाकूर
दूसऱ्या देशातील लोक भारताला राहण्या लायक मानत नसल्याचेही तिने सांगितले.
नवी दिल्ली : राष्ट्रीय पुरस्कार विजेती असलेल्या मोनाली ठाकुरने केलेल्या वादग्रस्त विधानामुळे ती सगळीकडे चर्चेचा विषय बनली आहे. भारताच्या प्रतिमेबद्दल काढलेल्या उद्गाराबद्दल तिने जनतेचा रोष ओढवून घेतलाय. इथले लोक जनावारांपेक्षा वाईट आहेत. दूसऱ्या देशातील लोक भारताला राहण्या लायक मानत नसल्याचेही तिने सांगितले.
जनावरांपेक्षाही वाईट
मोनाली ठाकुरने नुकतीच बीबीसीला मुलाखत दिली. 'मी प्रवास करताना मला खूप लाज वाटते. दुसऱ्या देशातील लोक भारताला राहण्या लायक मानत नाहीत. यामुळे दु:ख होत. आपला देश इतका सुंदर आहे. इथे इतकी सभ्यता आहे. पण आपण याचा चुकीचा फायदा घेतोय. आपण आपल्या देशाच्या परंपरेला अपमानित करत आहोत. फक्त बोलण्यासाठी आपण अॅडव्हान्स झालोय. जंगलीपणा हा तर प्राण्यांचा स्वभाव आहे. पण आपण तर त्यापेक्षाही वाईट आहोत.' असे तिने सांगितले.
'तमन्ना' रिलीज
मोनालीने गायलेल पहिल सिंगल गाण 'तमन्ना' रिलीज झालय. याबद्दल सांगताना ती म्हणते, मी खूप घाबरली होती कारण यामध्ये मी निळी लिपस्टिक लावली होती. श्रोत्यांनी मला कधी अशा लुकमध्ये पाहिलं नव्हत. पण माझ्या टीमचं खूप अभिनंदन त्यांनी हे सार चांगल निभावलं.