मुंबई : बिग बॉस १० ची स्पर्धक आणि भोजपुरी सुपरस्टार अंतरा विश्वास उर्फ मोनालिस सोशल मीडियावर हॉट टॉपिक असते. नुकताच मोनालिसाने सोशल मीडियावर नेटच्या साडीमधील एक फोटो शेअर केला. तिचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. मोनालिसा सध्या बंगाली वेब सीरिज दुपुर ठाकुरपोच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. हा या सीरिजचा दुसरा सीझन आहे. मोनालिसा यात झुमा भाभीची भूमिका साकारतेय. मोनाने शूटिंगदरम्यान आपले अनेक फोटोज सोशल मीडियावर शेअर केलेत. आपल्या झुमा भाभीच्या भूमिकेतील फोटोही तिने सोशल मीडियावर पोस्ट केलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोनालिसाचा हा हॉट आणि सेक्स लूक खूप व्हायरल होतोय. मोनालिसाने या सीरिजमधील एक गाणे आधीच लाँच झालेय. हे गाणे तिने सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये मोना बोल्ड स्टेप्स करताना दिसतेय. 



बिग बॉस १०मध्ये दिसलेली मोनालिसा आपल्या लुक्स आणि मनवीर गुज्जर आणि मनू पंजाबीसोबतच्या मैत्रीमुळे चांगलीच चर्चेत आली होती. तिने आपल्या प्रियकरासह घरातच लग्न केले होते यानंतर ती चांगलीच फेमस झाली होती. घरातून बाहेर आल्यानंतर तिने भोजपुरी सिनेमातील आपली फी वाढवली होती त्यामुळे तिला सिनेमाच्या ऑफर येणेही कमी झाले.